नाशिक : शहरातील मविप्र संचलित केटीएचएम महाविद्यालयातील पर्यावरणशास्र विभागाचे प्रा. के. डी. आहिरे यांना दुबई येथील आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दुबई येथील UAE-IMRF दुबई चाप्टर, रिविरा विद्यापीठ फ्रांस व जिनोवासी विद्यापीठ मलेशिया यांनी आयोजित केलेल्या “इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ऍग्रीकल्चर, एन्व्हार्नमेंट अँड बायोकेमिकल सायन्सेस” या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘पर्यावरणशास्र आणि शाश्वत शेती’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रा. अहिरे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी प्रा. आहिरे यांनी केटीएचएम महाविद्यालयात युजीसी-स्ट्राईड फंडेड संशोधन “शाश्वत शेती विकासासाठी सेंद्रिय खते व त्यांचे महत्व” या विषयावर विविध देशांमधून आलेल्या तज्ञ संशोधक, प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. तसेच, विविध प्रकारे केलेल्या यश संपादनामुळे व त्यांच्या कार्याचा गुणगौरव म्हणून दुबईचे चीफ इंटेलिजन्स ऑफिसर डॉ. मोहम्मद इब्राहिम यांच्या हस्ते प्रा. आहिरे यांना “यूएई राल्फ इहरलीच अकॅडेमिक एक्सलन्स अवॉर्ड” या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
याआधीही त्यांच्या कार्याची दखल घेत विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अनेक पुरस्कारांनी प्रा.आहिरे यांना गौरविले आहे. त्यांच्या या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संस्थेचे पदाधिकारी व शिक्षणाधिकारी डॉ. आर. डी. दरेकर, डॉ. नितिन जाधव, डॉ. भास्कर ढोके, डॉ. डी. डी. लोखंडे, डॉ. अजित मोरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, पर्यावरणशास्र विभागप्रमुख डॉ. पी. एम. नलावडे व अन्य प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम