केटीएचएम महाविद्यालयात पत्रकारिता व जनसंज्ञापन अभ्यासक्रमास प्रारंभ

0
28

नाशिक – शहरातील केटीएचएम महाविद्यालयातील ‘पत्रकारिता व जनसंज्ञापन’ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठीच्या (MA-JMC) प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला असून ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. तसेच, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर ही प्रवेश प्रक्रिया होणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या www.kthmcollege.ac.in या संकेतस्थळावर भेट देऊन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश सुनिश्चित करावा, अशी माहिती पत्रकारिता विभागाच्या प्रमुख प्रा. प्राची पिसोळकर यांनी दिली आहे.

माध्यमांमध्ये करिअर करू इच्छिणार्‍या व्यक्तींसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त असून ज्यात प्रिंट, टेलिव्हिजन, रेडिओ, डिजिटल पत्रकारितेसह, जनसंपर्क, जाहिरात, संशोधन, डॉक्युमेंटरी मेकिंग, ऑडिओ व्हिज्युअल प्रोडक्शन यांसारखे अनेक विषय इथे शिकू शकतात. प्रवेशासंबंधीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागात किंवा 9960016687 आणि 9975913090 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

तरी इच्छुकांनी लवकरात लवकर प्रवेश अर्ज भरून या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here