महाराष्ट्रात खळबळ श्रीवर्धनमध्ये एका बोटीत आढळल्या एके-47, कोकणात अलर्ट जारी

0
37

कोकण: राज्यात खळबळ उडाली असून कोकणात श्रीवर्धन समुद्र किनारी एक संशयास्पद बोट आढळली असून याठिकाणी बोटिमध्ये दोन ते तीन एके-47 आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून राज्यात घातपात घडवण्याची शक्यता आहे का याचा शोध घेतला जात आहे. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्भूमीवर ही घटना अतिशय धक्कादायक असून राज्यभरातील पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

नुकतेच रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली असून या बोटीमध्ये दोन ते तीन एके-47 आढळले असल्याची माहिती मिळाली आहे. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट खाण्याचे साहित्य, पाण्याच्या बॉटल व इतर साहित्य आढळून आले असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी माहिती देण्यास नकार दिला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. पोलिस अधिक तपास करत असून, 26/11 किंवा 93 च्या प्रकारची पुनरावृत्ती नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here