Kirit somayya : व्हायरल व्हीडिओ प्रकरणावर किरीट सोमय्यांनी मौन सोडलं म्हणाले…..

0
24

Kirit samanya wrote letter to devendra fadnavis : भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ एका मराठी वृत्तवाहिनीने प्रसारित केल्यानंतर त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. यावर प्रतिक्रिया देत किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली आहे. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, तसेच आक्षेप घेतले आहेत. अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत असेही सांगण्यात येत आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्यांच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स आहेत. असेही दावे केले जात आहे. तथापि, माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही. मी हे या ठिकाणी स्पष्ट करतो यामुळे अशा सर्व आरोपींची आपण चौकशी करावी अशी माझी आपणास विनंती आहे. हे व्हिडिओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडिओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्यांची चौकशी करावी अशी मी आपणास विनंती करीत आहे.
अश्या आशयाचे पत्र किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे.

https://thepointnow.in/kirit-somayya-viral-video/

नेहमीच विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडून या न त्या कारणाने चर्चेत राहणारे भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या हे आता स्वतःच अडचणीत सापडले आहेत. सोमवारी एका मराठी वृत्तवाहिनीने त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करत चारित्र्यसंपन्न भाजपमध्ये त्यांचे पदाधिकारी करत असलेल्या अश्लील वर्तनाचा भांडाफोड केला आहे. यामुळे आता किरीट सोमय्या यांची भारतीय जनता पक्षाने हकालपट्टी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील केली जात आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here