प्रेमात अडथळा ठरतेय म्हणून आईच्या 18 वर्षीय प्रियकराकडून १७ वर्षीय मुलीची हत्या!

0
18

द पॉइंट नाऊ : 17 वर्षीय पीडित मुलीच्या आईचे 18 वर्षीय युवकासोबत प्रेमसंबंध असल्याचे पीडित मुलीला ते आवडत नसल्याने ती या नात्याला विरोध करत होती. आरोपी आणि पीडितेची आई एका कारखान्यात एकत्र काम करायची या संबंधांमध्ये मुलगी अडसर बनत असल्याने त्या मुलीचा काटा काढण्याचे ठरवत तिची हत्या घडवून आणली. पोलिसांनी १८ वर्षीय आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे

आरोपी हा पीडितेच्या आईचा १८ वर्षीय कथित प्रियकर होता. त्यांच्या नातेसंबंधाला विरोध केल्याने आरोपीने पीडित मुलीची हत्या केल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली मुंडका पोलिस स्टेशनच्या लेख राम पार्क परिसरात बुधवारी एका 18 वर्षीय तरुणाने 17 वर्षीय मुलीची हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा तिच्या आईसोबत आरोपीच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. मृताची आई आणि आरोपी दोघेही बहादूरगडमधील एका कारखान्यात काम करत होते. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी दुपारी 1.11 वाजता, मुंडका पोलिसांना एक पीसीआर कॉल आला ज्यामध्ये असे सांगण्यात आले की टिकरी बॉर्डरच्या लेख राम पार्क परिसरात एका मुलाने मुलीचा गळा कापला आहे.घटना समजताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले, पोलिसांनी सांगितले की, तेथे सुमारे 17 वर्षांची एक युवती जखमी अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तिला ताबडतोब टिकरी बॉर्डर येथील सीएनसी रुग्णालयात नेले, जिथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.
नंतर 18 वर्षीय हरीश कुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुन्हेगाराला घटनेनंतर जमावाने ताबडतोब पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली.

पीडितेच्या ४८ वर्षीय आईसोबत आरोपीच्या संबंधांबद्दल पीडितेला मोठी चिंता होती, जी तपासादरम्यान आढळून आली. पोलिस पीडितेच्या पालकांचे जबाब नोंदवत असून
मुलीचा मृतदेह मंगोलपुरी येथील संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये शवगृहात ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन तपासणीनंतर मृतदेह पालकांना दिला जाईल.

फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आणि मोबाईल क्राईम युनिटचे एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. या प्रकरणी मुंडका पोलिस स्टेशनमध्ये कलम ३०२ (हत्येचा गुन्हा) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here