Nashik news | शिवमहापुराण कथेसाठी हजारो खान्देशवासीयांचा नाशिकमध्ये मुक्काम

0
77

Nashik news |  सिहोरमधील आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा ही नाशिक येथे २१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. या पाच दिवसीय कथेसाठी मालेगावसह अनेक खान्देशवासीय नाशिक येथे मुक्कामी आले आहेत.

त्यादृष्टीने आता भाविकांची लगबगही सुरु आहे. कथेबरोबरच ञ्यंबकेश्‍वर, सप्तशृंगगड इत्यादि ठिकाणी देवदर्शनही याकाळात करता येणार आहे. काही भाविक हे कथास्थळी पाच दिवसांसाठी मुक्कामीच राहणार आहेत. पंडीत प्रदीप मिश्रा यांची श्री शिवमहापुराण कथा ही मागीलवर्षी मालेगाव येथे झाली होती. या सात दिवसीय कथेला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.

jalna | अंतरवाली सराटी लाठीचार्ज प्रकरणी देवेंद्र फडणवीस निर्दोष

धुळे येथे नुकतीच १५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या काळात शिवमहापुराण कथा पार पडली. लाखो भाविकांनी ह्या कथेला हजेरी लावली होती. खान्देश भागात प्रदीप मिश्रांना प्रचंड भाविक मानतात. मोठ्या संख्येने खान्देशवासीय हे नोकरी, व्यवसायासाठी नाशिकमध्ये स्थिरावलेले आहेत.

त्यामुळे नाशिकची ही शिवमहापुराण कथा मालेगाव आणि धुळेप्रमाणेच यशस्वी होणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, कथास्थळी हजारो भाविक हे मुक्कामी राहतात.

दिवाळीच्या सुट्ट्या तसेच धुळे आणि नाशिक मधील शिवमहापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर नाशिक-मालेगाव आणि  खान्देशमधील बसस्थानके ही हाऊसफुल आहेत. कथेसाठी येणाऱ्या ह्या भाविकांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे.

Maharashtra politics | राऊत म्हणाले बावनकुळे जुगार खेळता; तर भाजप म्हणे आदित्यच्या ग्लासमध्ये कोणती व्हिस्की..?

“पंडीत प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेसाठी कित्येक वर्षे वाट बघावी लागते. २०२५ च्या अखेरपर्यंत देशातील विविध शहरांमध्ये त्यांच्या कथा ह्या आरक्षित आहेत. इतर राज्यातील त्यांची नियोजित कथा ही काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे धुळे तसेच नाशिक येथे प्रत्येकी पाच दिवसीय कथा मिळाली आहे. नाशिकसह खान्देशवासियांनी ह्या कथेचा लाभ घेवून पंडीत प्रदीप मिश्रा यांचे विचारही आचरणात आणावे.”

– दादा भुसे, पालकमंत्री (नाशिक) 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here