खानदेश महोत्सवात तालुक्यातील भूमिपुत्रांचा सन्मान

0
29

देवळा : नाशिक येथे होणाऱ्या भव्य खान्देश महोत्सवात देवळा तालुक्यातील दोन भूमिपुत्रांना खानदेशरत्न या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. त्यात सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांना आदर्श प्रशासक म्हणून तर श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध कीर्तनकार संजय महाराज धोंडगे यांना अध्यात्म क्षेत्रासाठी हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

२३ ते २५ डिसेंबर २०२२ या दरम्यान हा खान्देशमहोत्सव होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते तर प्रसिद्ध गायक शंकर महादेवन व इतर अनेक कलाकारांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. सदर खान्देशरत्न पुरस्कार्थींची नावे नुकतीच घोषित करण्यात आल्याने देवळा तालुक्यातून या दोन्ही भूमीपुत्रांचे अभिनंदन केले जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here