Nashik News| कैद्याच्या पोटात सापडली ‘किल्ली’! किल्लीचा पुढील तपास सुरू…

0
36

Nashik News : नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात कसे आणि काय कैद्यांपर्यंत पोहोचतं, याची नेहमीच चर्चा असते.पण, कारागृहातील एका कैद्याने चक्क किल्ली गिळंकृत केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पोटात दुखत असल्याने ह्या कैदयाला उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, दरम्यान, यावेळी शस्त्रक्रियेदरम्यान ही बाब उघडकीस आली आहे.

दरम्यान, ह्या कैदयाच्या पोटात असलेली किल्ली नेमकी कशाची आहे आणि त्याने ती का गिळली होती, अशा अनेक प्रश्नांमुळे नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, ही किल्ली नेमकी कुणाची आहे. याचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Pomegranate News | बळीराजाची दिवाळी होणार गोड! डाळिंबाची मोठी दरवाढ

विजय रामचंद्र सोनवणे (वय ४४) असे ह्या कैद्याचे नाव आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्याच्या पोटात दुखत होते. त्यामुळे त्याला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्याच्यावर करण्यात आलेल्या उपचारांमध्ये त्याच्या पोटात किल्ली असल्याचे कळाले आहे. त्याला पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. विजयने दोन महिन्यांपूर्वीच ही किल्ली गिळंकृत केल्याचीही माहिती समोर आली आहे.

किल्ली गिळंकृत केल्यापासून ह्या कैदयाला इतक्या दिवस काही त्रास झाला नाही का, ती किल्ली त्याच्यापर्यंत पोहोचली कशी, आणि ती किल्ली कशाची आहे, त्याने ती का गिळंकृत केली? हे व असे अनेक प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहेत. या प्रकारामुळे कारागृह प्रशासनाच्या कारभारावर  मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Manoj Jarange Patil| … आणि जरांगे पाटील स्टेजवरच कोसळले


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here