Skip to content

21 वर्षीय युवकाची गिरणा नदीपात्रात उडी टाकत आत्महत्या ; आकास्मात मृत्यूची नोंद


देवळा : सध्या लोहोणेर येथे वास्तव्यास असलेला व मुळचा गोराणे ( ता. बागलाण ) येथील रहिवाशी असलेल्या आकाश भारत आहिरे ( वय २१ ) या युवकाने शनिवारी रात्री लोहोणेर येथील गिरणा नदी पुलावरून उडी मारल्याने मरण पावला याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.

लोहोणेर येथे वास्तव्यास असलेल्या आकाश भारत आहिरे या युवकाने पुलावरून गिरणा नदी पात्रात उडी मारली. त्यास स्थानिक युवकांनी बाहेर काढले त्यास उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्या नी मृत घोषित केले. शवविच्छेदना नंतर आकाश यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात रविवारी दुपारी अत्यंत शोकाकुळ वातावरणात त्याचे मूळ गावी गोराणे (ता. बागलाण ) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत देवळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कचरे पुढील तपास करीत आहेत .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!