Nashik | छावा क्रांतिवीर सेना पुन्हा मैदानात; समर्थकांच्या मेळाव्यात करण गायकर यांची घोषणा

0
19

Nashik | १ जानेवारी २०२३ रोजी स्वराज्य संघटनेत विलीन करण्यात आलेली छावा क्रांतिवीर सेना पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. वर्षभरातच ‘स्वराज्य’च्या संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडलेल्या करण गायकर यांनी रविवारी (दि. २९) घेतलेल्या समर्थकांंच्या मेळाव्यात याबाबतची घोषणा केली आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या समर्थनात सोमवारपासून (दि. ३०) राज्यभरात छावा क्रांतिवीर सेना रस्त्यावर उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे.

नाशिक शहरात डेंग्युचा वाढता कहर; प्रशासन आलं अलर्ट मोडवर

‘स्वराज्य’मधून बाहेर पडल्यानंतर पुढची दिशा ठरविण्यासाठी करण गायकर यांनी समर्थकांचा मेळावा घेतला.  मेळाव्यासाठी नाशिकसह नांदेड, छत्रपती संभाजी नगर, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, बीड, जळगाव, जालना, ठाणे, धाराशिव, परभणी, धुळे, लातूर, परभणी, रायगड आदी जिल्ह्यातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समर्थकांनी आपल्या भावना व्यक्त करत, छावा क्रांतिवीर सेना पुन्हा कार्यान्वित केली जावी, अशी एकमुखी मागणी केली आहे. यावर करण गायकर यांनी १ जानेवारी २०२४ रोजी संघटनेचे भव्य अधिवेशन आयोजित करून संघटनेच्या महाराष्ट्रासह इतर राज्यात पसरविण्यासाठी जोमाने कार्य करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

करण गायकर म्हणाले, ‘छावा क्रांतिवीर सेना स्वराज्यमध्ये विलीन करताना राज्यभरातील तमाम सहकार्यांना स्वराज्यमध्ये न्याय देणार असल्याचा मी शब्द दिला होता. मात्र, त्यास मी अपयशी ठरत असल्याचे दिसून आल्यानंतर मी स्वराज्यमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षभरात काय घडले यावर चर्चा न करता संघटनेचे वादळ राज्यभर निर्माण करणार आहे.

यावेळी करण गायकर यांनी टीकाकारांचा समाचार घेताना म्हटले, ‘मी शांत आहे म्हणजे संत नाही. मी बोलत नाही म्हणून अनेकजण मी चुकल्याचा प्रचार करत आहे. माझ्यावर आरोप करत आहेत. मात्र, मी शांततेनेे कामातून उत्तर देणार आहे. तसेच आम्हाला कोणी निष्ठा शिकवण्याचा प्रयत्न करू नये. युवराज संभाजी राजे यांच्याविषयी आजही मनात निष्ठा असून, संघटना सोडली म्हणजे छत्रपतींना सोडले असे होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान,‘नवे पर्व,नवे ध्यये,नव्या संकल्पाची वादळवाट’ ही टॅगलाइन घेवून ही संघटना मैदानात उतरणार आहे.

Jammu and Kashmir| भारत-पाक सीमेवर शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना…
मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार
मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेले मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ छावाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर उतरावे, प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन उभे करावे असे आवाहनही करण गायकर यांनी समर्थकांना केले.  मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने दाद द्यावी, अन्यथा छावा क्रांंतिवीर सेना मंत्रालय गाठेल असा इशाराही त्यांनी याप्रसंगी दिला. तसेच पुढील काळात पुण्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागपूरमध्ये रोजगार हमी योजनेच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर छावा क्रांतिवीर सेना आंदोलने करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

… तर नेत्यांना घरबंदी करू
मराठा आरक्षणावरून राज्यभरात नेत्यांना गावबंदी केली जात आहे. मराठा आरक्षणावर तोडगा न निघाल्यास छावा क्रांतिवीर सेना नेत्यांना घरबंदी करेल असा इशाराही करण गायकर यांनी दिला आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here