Kalyan News | कधी कोयता गँगची दहशत तर, कधी पतीकडून बायको-मुलाची हत्या. गुन्ह्याच्या विविध घटनांमुळे कल्याण शहर हे गेल्या काही दिवसांपासून बरेच चर्चेत आहेत. शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कल्याणमधील (Kalyan News) कोळसेवाडी ह्या परिसरात एका पान टपरी चालकाला कोयत्याचा धाक दाखवत त्याची लुट झाल्याची घटना ताजी असतानाच आता असाच एक प्रकार समोर आलेला आहे.
कल्याणच्या (Kalyan News) पश्चिम भागात भररस्त्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण केल्याची घटना ही उघडकीस आली आहे. एवढंच नाही तर, त्याला बेदम मारहाण देखील करण्यात आली तसेच चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून हजारो रुपयेदेखील लुटण्यात आले आहेत. नीरज भोलानाथ यादव असे ह्या संबंधित जखमी विद्यार्थ्याचे नाव असून, हा विद्यार्थी मूळचा अंबरनाथ येथील रहिवासी आहे. या घटनेप्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात (Kalyan News) तीन अनोळखी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.
Malegaon | मालेगाव विकास कामांसाठी पहिल्याच दिवशी ९३ कोटींचा निधी
रिक्षा बघत होता, तितक्यात…
या प्रकरणातील विद्यार्थी नीरज हा मूळचा अंबरनाथ येथील असून तो कल्याणमध्ये (Kalyan News) कॉलेजमध्ये शिक्षणासाठी येतो. मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा विद्यार्थी घरी जायला निघाला असता, शहाड जकात नाका येथे तो रिक्षाची वाट बघत होता. पण, तेवढ्यात तिथे हे तिघे आरोपी आले आणि त्यांनी जबरदस्तीने नीरजला त्यांच्या दुचाकीवर बसवले. नीरज तिथे एकटाच असल्या कारणाने तो त्यांना प्रतिकार करू शकला नाही. आरोपींनी त्याला जबरदस्तीने म्हारळ गावाजवळील टेकडीवर नेले व तिथे त्याला जबर मारहाण केली.
एवढंच नाही तर, त्या तिन्ही चोरट्यांनी नीरजला चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकीदेखील दिली. त्यानंतर त्यांनी नीरज याच्याकडे असलेले डेबिट कार्ड आणि रोख रक्कम ताब्यात घेत जवळच्याच एटीएममधून त्यांनी पैसे काढले. तसेच त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन तसेच पाकिटातील रोख रक्कमदेखील संबंधित आरोपींनी हिसकावून घेतली व तिथून पसार झाले.(Kalyan News)
Satana News | सटाणा नगरपालिका ही राज्यात अव्वल!
हल्लेखोरांच्या ताब्यातून सुटल्यानंतर जखमी नीरजने कसेबसे कल्याण (Kalyan News) येथील महात्मा फुले पोलीस स्टेशन गाठलं व तेथील अधिकाऱ्यांना त्याने हा सर्व प्रकार कथन करत त्या तीन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. त्याआधारे आता महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, कल्याण (Kalyan News) पोलिसांनी संबंधित आरोपींचा शोध घेण्यास युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम