Kalyan | भेटायला गेलो आणि मुख्यमंत्र्यांनी पक्षप्रवेश करून घेतला

0
93
Kalyan
Kalyan

Kalyan |  सध्या राज्यासह देशात अनेक राजकीय घडामोडी  घडताना दिसत आहेत. त्यात सध्या चर्चेचा विषय ठरतोय, तो कल्याणमधील एका नगरसेवकाचा पक्षप्रवेश. परवा शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकाने एका दिवसातच पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान, मंगळवारी माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आणि आता एकाच दिवसात ते पुन्हा ठाकरे गटात परतले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे वैयक्तिक कामासाठी गेलो होतो आणि त्यांनी आपला पक्षप्रवेश करून घेतला असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. (Kalyan)

दुसऱ्यांचा पक्षप्रवेश अन् माझ्या हातात झेंडा 

माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण हे एका दिवसातच पुन्हा आपल्या स्वगृही परतले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझे चांगले संबंध असून, मी ज्यावेळी पहिल्यांदा नगरसेवक झाळो होतो. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी मला खूप सहकार्य केलं होतं. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी त्यांना भेटायला गेलो असता, त्यावेळी त्याठिकाणी डोंबिवली येथील काही पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेशाचा सोहळा सुरू होता आणि त्यातच माझ्या हातात पक्षाचा झेंडा दिला आणि माझाही पक्षप्रवेश करून घेतला. मला याबद्दल काहीही माहिती नव्हतं. (Kalyan)

Kalyan Lok Sabha | मुलाची जागा आली, पण शिंदेंच्या हातून बालेकिल्लाच गेला..?

कल्याणमध्ये मुलं पळवणारी टोळी

दरम्यान, माजी  नगरसेवक पुरूषोत्तम चव्हाण यांच्या आरोपानंतर कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार उमेदवार वैशाली दरेकर यांनीही एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. यावेळी त्या म्हणाल्या की, “कल्याणमध्ये मुलं पळवणाऱ्या टोळीसारखे कार्यकर्ते व पदाधिकारी पळविणारी एक टोळी सध्या सक्रिय झाली आहे. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सावध रहावे. (Kalyan)

Kalyan Lok Sabha | श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरे गटाकडून ‘या’ महिला उमेदवाराला संधी.?

Kalyan | ते स्वतःहून त्या ठिकाणी आलेले होते

मंगळवारी पुरुषोत्तम चव्हाण यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि आज ते हे सर्व कसं नाकारताय..? असा सवाल शिंदे गटाचे नेते विवेक खामकर यांनी केला आहे. चव्हाण यांचे आरोप म्हणजे एक जाणीवपूर्वक घडवलेले षडयंत्र आहे. आणि एक पुरुषोत्तम चव्हाण गेल्याने आम्हाला काय फरक पडणार आहे..? यामुळे तुम्ही स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला. लोकांची अशी दिशाभूल करू नका. पुरुषोत्तम चव्हाण हे स्वतःहून त्या ठिकाणी आलेले होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. (Kalyan)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here