राम शिंदे : प्रतिनिधी – सर्वतीर्थ टाकेद | आकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या (Bhandardara Dam) पाणलोटातील काजवा महोत्सवाची तयारी पुर्ण झाली असुन वन्यजीव विभागाकडुन काजव्यांचा पर्यटकांना मनमुराद आनंद घेता यावा. यासाठी काही बंधने घातली असुन रात्री ९ नंतर कोणत्याही परिस्थितीत पर्यटकांना अभयारण्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचे वन्यजीव विभागाकडुन बैठकीत सांगण्यात आले आले आहे.(Kajwa Mahotsav)
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी २५ मे १५ जुनच्या दरम्यान काजव्यांची चमचम बघावयास मिळते. काजव्यांचा हा करिष्मा बघण्यासाठी दरवर्षी पर्यटक मोठ्या संख्येने अभयारण्यात येतात. यावर्षी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता त्या गर्दीचे नियत्रंण करण्यासाठी वन्यजीव विभागाकडुन काही बंधने घालण्यात आली असुन काजवा महोत्सवासंदर्भात शेंडी येथे वन्यजीव विभागाच्या विश्रामगृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक सरोदे, वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे, वनपाल शंकर लांडे, भास्कर मुठे, परिसरातील टेंट धारक व वन्यजीव विभागाचे कर्मचारी हजर होते.(Kajwa Mahotsav)
Igatpuri | वीटभट्टी व्यावसायिकांनाही अवकाळीचा फटका; मोठे आर्थिक नुकसान
काजवा वाचला तरच काजवा महोत्सव वाचेल
या आढावा बैठकीत काजवा वाचविण्याचे आवाहन करण्यात आले. ‘जर काजवा वाचला तरच काजवा महोत्सव वाचेल’ असे वन्यजीव विभागाकडुन सांगण्यात आले. काजवा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना रात्री ९ वाजेच्या आतच परवाणगी देण्यात आली असुन, ९ वाजेनंतर कुणालाही प्रवेश मिळणार नाही. काजवा हा अभयारण्यात असुन प्रवेश शुल्क आकारुनच अभयारण्यात प्रवेश मिळेल. अभयारण्यात ठिकठिकाणी वाहनतळ बनविण्यात आले असुन या वाहनतळावरच वाहने पार्कींग करणे बंधनकारक राहील.(Kajwa Mahotsav)
Igatpuri | इगतपुरीत मतदानाबद्दल उदासीनता; राजकीय भूमिकांचा परिणाम
Kajwa Mahotsav | असे आहेत नियम
अभयारण्यात कोणत्याही प्रकारचा मद्यसाठा नेऊ दिला जाणार नाही. अभयारण्यातील टोलनाक्यावर पोलिस विभागाकडुन वाहनांची तपासणी करण्यात येईल. अभयारण्यात काजवा बघण्यासाठी गेलेल्या पर्यटकांनी काजव्यांचा आनंद घेताना दुरुनच आनंद घ्यावा. काजव्यांच्या झाडांना हलवु नये. काजवा स्थळ सोडुन पर्यटकांनी जंगलात एकटे फिरु नये. काजवा बघुन झाल्यानंतर रात्री दहा वाजेच्या आत अभयारण्यातुन बाहेर पडावे. अभयारण्यात टेंट साईडवर बुकींग केलेल्या पर्यटकांची नोंदवहीत नोंद करणे बंधनकारक राहील.(Kajwa Mahotsav)
रात्री दहा वाजेनंतर अभयारण्यात कोणतेही वाद्य वाजविण्यास परवाणगी देण्यात येणार नाही. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायद्याचा बडगा उगारला जाणार असल्याचे सुतोवाच वन्यजीव विभागाकडुन देण्यात आले आहेत. राजुर पोलिसांच्या वतीने सर्व पर्यटकांनी काजवा महोत्सवाचा शांततेत आनंद लुटण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम