कळवण : पिंपळगाव बसवंत येथील टोलनाका परिसरात गांजाचे झाड आढळून आले होते, यासाठी वार्ताकन करण्यास गेलेले पत्रकार रावसाहेब उगले यांना टोलनाक्यावरील टोल कंपनी अधिकारी व कर्मचारी यांनी मारहाण करण्याची धमकी दिली तसेच पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांनी देखील उर्मट भाषा वापरून पत्रकार बांधवास अपमानित केले आहे.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधीत टोल अधिकारी तसेच पोलीस उपअधीक्षक भोसले यांच्या विरोधात योग्य ती कडक कारवाई करावी याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई सलंग्न, नाशिक जिल्हा ग्रामीण पत्रकार बांधवांकडून नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक ( ग्रा) सचिन पाटील यांना देण्यात आले आहे. याबाबत उचित कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव तसेच पत्रकार संघटना यांच्या मार्फत पोलीस विभाग नाशिक यांच्या विरुद्ध तीव्र निषेध व आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रकार संघातर्फे देण्यात आला आहे.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार विकास काका देशपांडे, नाशिक जिल्हाध्यक्ष (ग्रा ) दिपक गांगुर्डे आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम