Skip to content

तुम्ही बाळाला जॉन्सन बेबी पावडर लावताय ! तर थांबा… आधी ही बातमी वाचा


मुंबई – राज्य अन्न व औषध प्रशासनाद्वारे जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेडच्या नाशिक व पुणे येथील बेबी पावडरचे नमुने घेतल्यानंतर अखेर जॉन्सन बेबी पावडरच्या उत्पादनाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेडवर कडक कारवाई केली आहे. आलेल्या बातमीनुसार, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील मुलुंड येथील जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेडच्या जॉन्सन बेबी पावडरच्या प्लांटवरचा उत्पादन परवाना रद्द करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाकडून असे सांगण्यात आले आहे, की गोळा केलेल्या बेबी पावडरचे नमुने गुणवत्तेच्या मानकांशी जुळत नाहीत. जे मुलांच्या त्वचेसाठी देखील चांगले नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या संस्थेने औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० अंतर्गत कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच प्रशासनाने कंपनीला अशी सूचना केली, की जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने जॉन्सन बेबी पावडरचा साठा बाजारातून त्वरित काढून घ्यावे.

राज्य सरकारच्या ह्या संस्थेने असेही म्हटले आहे, की ह्या पावडरच्या उत्पादनामुळे नवजात बालकांच्या त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच मिळालेल्या अहवालानुसार गेल्या महिन्यात जॉन्सन अँड जॉन्सनने सांगितले, की ते २०२३ मध्ये जागतिक स्तरावर बेबी पावडरची विक्री थांबवेल.

ताज्या अहवालानुसार, जवळपास २ वर्षांहून अधिक काळानंतर ह्या पावडरच्या उत्पादनाची विक्री करणे अमेरिकेत थांबवले आहे. २०२० मध्ये, कंपनीने अशी घोषणा केली होती, ते अमेरिका व कॅनडामध्ये त्यांच्या टॅल्को बेबी पावडरची विक्री थांबवेल. त्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सनच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली होती.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!