Jalna Crime | जालना जिल्हा सध्या विविध कारणांमुळे संपूर्ण राज्यभरात जोरदार चर्चेतआहे. दरम्यान, ह्या जाळण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोटच्या गोळ्यानेच आपल्या जन्मदात्या वडिलांना संपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.(Jalna Crime)
दरम्यान, या संतापजनक घटनेमुळे परिसरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक माहितीनुसार, स्वतःचे राहते घर हे विकण्यासाठी मयत वडिल इब्राहीम खान मुबारक खान (वय- ६० वर्षे, अक्सा मशीद परिसर) यांनी विरोध केला. यामुळे उद्भवलेल्या किरकोळ वादातून ही हत्या केलेली अस्लयची माहिती उघडकीस आली आहे. शाहरुख इब्राहीम खान (वय- ३० वर्षे) असे संबंधित संशयित आरोपी असलेल्या मुलाचे नाव आहे. (Jalna Crime)
Pune Crime | आधी लग्नाचे ‘प्रॉमिस’ आणि नंतर डांबून ठेवत मारहाण अन् अत्याचार
बाप लेकट झालेल्या किरकोळ वादातून ह्या आरोपी मुलाने थेट वडिलांच्या डोक्यात लाकडी दांड्याने बेदम मारहाण करत त्यांची हत्या केल्याची माहिती समोर आलेली आहे. जालना ह्या शहरातील गांधीनगर परिसरात सोमवार (१८ डिसेंबर ) रोजी दुपारी ही घटना घडली आहे. इब्राहीम खान मुबारक खान असे मयत पित्याचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा शाहरुख इब्राहीम खान याला अटक केली आहे. (Jalna Crime)
लाकडी दांड्याने केला वार
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायाने रिक्षाचालक असलेला आरोपी शाहरुख इब्राहीम खान हा मयत वडील इब्राहीम खान यांना त्यांचे राहते घर विकण्यासाठी वारंवार सांगत होता. पण त्याच्या वडिलांचा याला विरोध असून, या कारणामुळे बाप-लेकात नेकायम वाद होत असायचे. काल दुपारच्या सुमारास याच कारणावरून झालेल्या वादातून आरोपी शाहरुख खान याने त्याचे जन्मदाते वडील इब्राहीम खान यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार करत जबर जखमी केले. दरम्यान, ह्या मारहाणीत रक्तबंबाळ होऊन जखमी वडील बेशुद्ध पडले. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
Deola Crime | शहरात अश्लील चाळ्यांसाठी चालणाऱ्या कॅफेवर पोलिसांनी टाकली धाड
बाप-लेकांत नेहमीच वाद
मयत इब्राहीम खान हे जालना शहरातील गांधीनगर ह्या परिसरात राहतात. त्यांचा मुलगा आरोपी शाहरुख हा रिक्षा चालवून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान`, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे गांधीनगर परिसरामधील घर विकण्याचा आग्रह आरोपी मुलगा शाहरुख याने धरला होता. पण हे घर न विकण्याच्या निर्णयावर वडील ठाम होते.
त्यामुळे ह्या बाप लेकात अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. दरम्यान, सोमवारी देखील ह्याच कारणांवरून त्यांच्यात पुन्हा जोरदार भांडणं झाले. दरम्यान, ही भांडणं इतकी टोकाला गेली की, मुलाने रागात वडिलांना लाकडी दांड्याने जबर मारहाण केली आणि त्यांच्या डोक्यात दांडा मारला. दरम्यान, याच मारहाणीत जखमी होत त्यांचा मृत्यू झाला. (Jalna Crime)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम