Jalgaon News | गोळीबाराच्या घटनेनंतर जळगाव पोलीस प्रशासन सतर्क; नेमके प्रकरण काय…?

0
38
#image_title

Jalgaon News | जळगाव शहरात पहाटेच्या सुमारास शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांच्या घरावर अज्ञातांकडून गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. आज सकाळी पहाटे चारच्या सुमाराचे घटना घडली. निवडणूक विभागाचे सामान्य निरीक्षक सामान्य पोलीस निरीक्षक, जिल्हा पोलीस अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.

Jalgaon News | ६ वर्षीय चिमूकलीवर अत्याचार; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक

तपासा दरम्यान रस्त्यावर तीन रिकामी काडतुसे हस्तगत

अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांच्या घरावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला यावेळी तीन गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीच्या आवाजाने जागे होऊन तपासणी केली असता त्यांना काचेच्या खिडकीचा चकणातुर झालेला दिसला व त्यामध्ये गोळ्यांचे छिद्र सापडले. त्यानंतर त्यांच्याकडून त्वरितच पोलिसांना कळविण्यात आले. चौकशी केली असता रस्त्यावर तीन रिकामी काडतुसे सापडली. झडती दरम्यान खोलीत एक गोळी सापडली.

Jalgaon | दिव्यांग मुलांनी शाडूच्या मातीने बनवल्या बाप्पाच्या सुरेख मुर्त्या

शेख हुसैन AIMIM चे जिल्हाध्यक्ष

शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन AIMIM चे जिल्हाध्यक्ष असून त्यांना अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने ते अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहेत. अहमद हुसैन यानी कुणावरही संशय व्यक्त केलेला नाही. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत पहाटे 3:42 वाजता त्यांच्या घराजवळ एक मोटर सायकल आढळून आली आहे. या संदर्भातील पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here