Jalgaon crime | पोटच्या मुलानेच निर्घुणपणे जन्मदात्याला संपविले

0
17
Nashik Crime News
Nashik Crime News

Jalgaon crime |  जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्याच्या शेंदुर्णी येथून एका बाप लेकाच्या नात्याला काळीमा फसणारे खुनाचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी शेंदुर्णी येथे किरकोळ शेतीच्या वादातून पोटच्या मुलानेच जन्मदात्या वयस्कर पित्याचा खून केल्याची संतापजनक घटना उघडकीस आलेली आहे.

दरम्यान, ह्या माणुसकीला काळीमा फसणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. ह्या खुनाच्या घटनेत मृत पित्याचे नाव हे नाना बडगुजर (वय – ८२) असे आहे. दरम्यान, पित्याचा खून करून पसार झालेला आरोपी कैलास नाना बडगुजर (वय – ५६) याला जळगाव पोलिसांनी (Jalgaon crime) शनिवार (दि. ९ डिसेंबर ) रोजी रात्रीच्या सुमारास जळगाव मधीलच पाचोरा येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

Nashik Crime | वणी पोलिस ठाण्यात संशयिताची पोलिसाला धक्काबुक्की

नेमके प्रकरण काय..?

या प्रकरणी, मयत पिता नाना बडगुजर यांचे तरंगवाडी येथील शिवारात शेत आहे. नाना बडगुजर हे शनिवार रोजी सकाळच्या दरम्यान त्यांच्या शेतातील कापूस वेचत असतानाच त्यांचा मुलगा आरोपी कैलास नाना बडगुजर हा शेतात आला आणि तो वडीलांसोबत त्यांच्या शेताच्या वाटणी वरून जोरदार भांडण करू लागला. त्यांच्यातील किरकोळ शाब्दीक वाद हा वाढत गेल्याने संबंधित आरोपी मुलगा कैलास याने फावडयाने त्याचे वडील नाना बडगुजर यांच्या डोक्यात वार केला. त्यामुळे आधीच वयोवृद्ध असलेल्या नाना बडगुजर यांचा तेथेच मृत्यू झाला.

दरम्यान, ही संपूर्ण घटना घडली त्यावेळी संबंधित आरोपीचा मुलगा विशाल तसेच आरोपीची पत्नी हे शेतात काम करत होते. आरोपीचा मुलगा विशाल याने त्याच्या वडिलांनी आजोबाच्या डोक्यात वार केल्याची घटना बघताच त्याने त्या दिशेने धाव घेतली. आणि त्याने वडीलांच्या हातातुन फावडे हिसकावले आणि जबर जखमी अवस्थेतील आजोबांना सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते काहीच हालचाल करत नसल्याचे बघतच आरोपी निर्दयी मुलगा हा त्यांना तिथेच जखमी अवस्थेत टाकून फरार झाला.

Kalyan News | भररस्त्यातून तरुण विद्यार्थ्याचे अपहरण आणि जबर मारहाण

दरम्यान, आरोपी कैलास नाना बडगुजरचा मुलगा विशाल कैलास बडगुजर (वय – ३३) याने त्याचे वडिल तसेच संशयित आरोपी कैलास बडगुजर यांच्या विरोधात पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिल्यावरून ह्या आरोपीच्या विरोधात पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, आता पर्यंत ह्या प्रकरणातील संबंधित आरोपी याला ताब्यात घेण्यात आलेले असून, ह्या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर पुढील तपास जळगाव पोलिस करीत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here