Infotech news | थांबा..! एक QR Code Scan करताना ही काळजी घ्या, नाहीतर…

0
19

Infotech news |  सध्या सगळीकडेच आपण सहजपणे क्युआर कोड हा वापर असतो. भाजी खरेदी असूदेत किंवा मग हॉटेलचा मेन्यू पाहण्यासाठी असूदेत क्युआर कोड स्कॅन करतो आणि मगच आपण आपले प्रेतएक व्यवहार करत असतो. पण, हाच क्युआर कोड स्कॅन करणं हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. सध्य़ा सगळीकडेच सायबर भामटे कधी व कोणत्या बाबतीत फ्रॉड करतील याचा काही एक नेम नाही. त्यामुळे क्यूआर कोड स्कॅन करताना नक्की ही विशेष काळजी घ्या नाहीतर तुमची आयुष्यभराची कमाई ही सायबर चोरट्यांच्या खिशात जाऊ शकते.

काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगीदेखील अशाच एका प्रकारच्या ऑनलाइन घोटाळ्याची शिकार झाल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. ज्यामध्ये तिने ऑनलाइन सेकंड हँड मार्केट प्लेसवर जुना सोफा सेट विकण्याचा प्रयत्न केला होता. पण,  त्या बदल्यात तिने ३४ हजार रुपये गमावले होते. मागील काही दिवसांत अशी अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत. येथे आम्ही तुम्हाला क्यूआर कोड स्कॅमची ही पद्धत आणि ते टाळण्यासाठी गरजेच्या टिप्स सांगणार आहोत.(Infotech news)

कसा होतो क्यूआर कोड घोटाळा?

जेव्हा कोणी एखाद्या ऑनलाइन वेबसाइटवर वस्तू टाकतो, तेव्हा हा घोटाळा सुरू होतो. जेव्हा हे फसवणूक करणारे सायबर चोरटे स्वतःला खरेदीदार म्हणून सांगतात आणि आगाऊ किंवा टोकन रक्कम भरण्यासाठी आपल्याला क्यूआर कोड स्कॅन करायला सांगतात. तसेच स्कॅमर्स स्कॅनिंग करून पैसे मिळण्याची माहिती देतात. युजर्स हा क्यूआर कोड स्कॅन करताच त्यांच्या खात्यातून पैसे हे कापले जातात.

Winter Session | उद्या हिवाळी अधिवेशन; आज नाटकीय घडामोडी

कसा ओळखावा क्यूआर घोटाळा?

हा घोटाळा ओळखण्यासाठी सुरुवातीला स्कॅन करणाऱ्या व्यक्ती ह्या माहित असणे आवश्यक आहे. की, क्यूआर कोड हा फक्त पैसे पाठविण्यासाठी स्कॅन केला जातो. पैसे मिळवण्यासाठी नाही. हा घोटाळा ओळखण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, ज्याद्वारे आपण बनावट क्यूआर कोड किंवा बनावट वेबसाइट ह्या ओळखू शकतात. जर एखादी वेबसाइट “https://” पासून सुरू होत नसेल व वेबसाइटच्या नावातील स्पेलिंग ही चूकीची असेल. तर, तुम्हाला समजू शकते की ती खोटी वेबसाइट आहे. त्यामुळे स्कॅन करताना संबंधित वेबसाईटची माहिती असणं आवश्यक आहे. (Infotech news)

कसे टाळावे हे घोटाळे?

क्यूआर कोड घोटाळे हे टाळण्यासाठी यूपीआय आयडी व बँक डिटेल्स हे अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करणे टाळावे. ऑनलाइन व्यवहारांची पडताळणी करा व संशयास्पद क्यूआर कोडपासून सावधगिरी बाळगावी. नाहीतर ह्या हलगर्जीपणाचा मोठा तोटा होऊ शकतो.(Infotech news)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here