Infotech news | ह्या फोनवर मिळताय इअरबड्स मोफत; आताच करा बुक

0
17

Infotech news |  iQOO 12 5G ह्या स्मार्टफोनची आज पासून प्री-बुकिंगही सुरु झालेली आहे. हा आगामी स्मार्टफोन ऑफिशियल स्टोर तसेच ई-कॉमर्स या वेबसाइट Amazon वरून प्री-बुक करता येणार आहे. हा स्मार्टफोन येत्या ७ तारखेला भारतात लाँच केला जाणार आहे. हा पहिला स्मार्टफोन असणार आहे, जो क्वॉलकॉमच्या नव्या व सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Gen 3 ह्या चिपसेटसह भारतात येणार आहे. हा स्मार्टफोन आधी चीनमध्ये दाखल झालेला आहे.

असे करा प्री-बुकिंग ?

iQOO 12 5G ह्या स्मार्टफोनची प्री-बुकिंग हि अ‍ॅमेझॉन इंडिया वर दुपारी १२ वाजता सुरु झालेली आहे. आणि हि ७ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. हा स्मार्टफोन फक्त ९९९ रुपयांमध्ये प्री-बुक करता येणार आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनवर Vivo चे इअरबड्स फ्री दिले मिळणार आहेत. ज्यांची किंमत हि २९९९ रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे प्री-बुकिंग अमाउंट हि रिफंडेबलदेखील आहे.Infotech news

काय आहे किंमत ?

iQOO 12 5G  हा १२ डिसेंबरला भारतात लाँच होणार आहे. ह्या कंपनीनं  iQOO 12 5G च्या किंमतीची अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. तर आतापर्यंत झालेल्या लीक्सनुसार ह्या  फोनची प्रारंभिक किंमत हि ५० ते ५५ हजार इतकी असू शकते. दरम्यान, खरी किंमत हि लाँच नंतरच समजणार आहे.

Big news | मिचॉन्ग चक्रीवादळामुळे ८ जणांचा मृत्यू; तर सर्व सेवा विस्कळीत

असे आहेत iQOO 12 5G चे स्पेसिफिकेशन

iQOO 12 5G ह्या अँड्रॉइड १४ आधारित फनटच १४ वर चालणार आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचाचा एलटीपीओ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिलेला आहे. ज्याचे रिजोल्यूशन २८०० × १२६० पिक्सल इतके आहे. तर, रिफ्रेश रेट हे १४४ हर्ट्झ व पीक ब्राइटनेस ३००० निट्स आहेट. याची स्क्रीन एचडीआर१०+ ला सपोर्ट करते तर, ह्यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसर तसेच अ‍ॅड्रिनो ७५० जीपीयू देखील देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये १६जीबी पर्यंत रॅम व ५१२जीबी पर्यंत स्टोरेज देखील मिळणार आहे.Infotech news

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपदेखील  मिळणार आहे. ह्यात पहिला ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, आणि ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा व ६४ मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सरदेखील आहेत. सेल्फीसाठी ह्या फोनच्या फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देखील आहे.

iQOO 12 5G  ह्या स्मार्टफोन मध्ये ५००० एमएएचच्या बॅटरीसह येतो आहे. जी १२० वॉट फास्ट चार्ज, ५० वॉट वायरलेस चार्जिंग व १० वॉट रिवर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर व हाय-फाय ऑडियो देखील मिळतो आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ तसेच यूएसबी टाईप-सी पोर्टदेखील देण्यात आलेला आहे.Infotech news

Big breaking | मोठी बातमी..! राजपूत करणी सेना अध्यक्षाची गोळी झाडून हत्या


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here