Infotech news | iPhoneच्या लुक व फीचर्ससह आला हा अँड्रॉइड स्मार्टफोन

0
24

Infotech news |  Tecno ने आताच चीनमध्ये आपला Spark 20C हा स्मार्टफोन लाँच केलेला आहे. आता ह्या कंपनीने आपल्या स्पार्क ह्या सीरीजमध्ये नवीन मोबाइल Spark 20 आणला आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या ग्लोबल साइटवर सर्व स्पेसिफिकेशन्ससह नुकताच लिस्ट करण्यात आलेला आहे.(Infotech)

ह्या Tecno Spark 20 स्मार्टफोनची किंमत कंपनीनं अद्याप सांगितलेली नाही. पण, ग्लोबल वेबसाइटवर लिस्ट झालेल्या ह्या फोनचे स्पेसिफिकेशन्स हे बजेट फोनसारखेच आहेत. हा स्मार्टफोन मागून अगदी आयफोन (iPhone)सारखाच दिसतो. तसेच डायनॅमिक आयलँड प्रमाणे डायनॅमिक पोर्टदेखील देतो. ह्या फोनची खासियत म्हणजे याचा बॅक पॅनल हा iPhone सारखाच दिसत असून, ज्यात दोन सेन्सर व एक एलईडी आहे. कॅमेरा मॉड्यूल व्यतिरिक्त ह्या डिव्हाइसमध्ये डायनॅमिक आयलँड सारखे फीचर्स देखील मिळणार आहेत.

अशी आहे ह्या स्मार्टफोनची किंमत

टेकनो ह्या कंपनीने सध्या ह्या नवीन स्मार्टफोनच्या किंमतीची माहिती दिलेली नाही. पण, स्पेसिफिकेशन्स बजेट सेगमेंटचेच आहेत. त्यामुळे ह्या स्मार्टफोनची किंमतदेखील जास्त नसेल, हे स्पष्टच झालेलं आहे. तसेच, हा फोन ग्रॅव्हिटी ब्लॅक, सायबर व्हाइट, निऑनगोल्ड व मॅजिक स्किन २.० अशा चार कलर ऑप्शन्समध्ये बाजारात सादर करण्यात आलेला आहे.

असे आहेत स्पेसिफिकेशन्स 

टेक्नो कंपनीने ६.५६ इंचाचा एलसीडी पॅनल दिलेला आहे. तसेच एचडी+ (७२०×१६१२ पिक्सल) रिजोल्यूशन असलेला हा डिस्प्लेदेखील देण्यात आला आहे. जो ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटलादेखील सपोर्ट करतो. डिजाइनच नव्हे तर टेक्नोने आपल्या ह्या स्मार्टफोनमध्ये आयफोनच्या (iPhone) डायनॅमिक आयलँड सारखे फीचर्सही दिलेले आहेत. ह्या फीचरला कंपनीने डायनॅमिक पोर्ट असे नाव दिलेले आहेत. याच्या माध्यमातून नोटिफिकेशन्स तसेच इतर डीटेल्स हे पंच होलच्या बाजूच्या स्क्रीनवर दिसतील.(Infotech)

हा MediaTek Helio G85 ह्या प्रोसेसरसह बाजारात आलेला आहे. त्याबरोबरच ८जीबी पर्यंतच्या रॅमसह २५६जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज देखील देण्यात आलेली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड आधारित हायओएस १३ ह्या स्किन वर चालतो. पावर बॅकअपसाठी ह्या फोनमध्ये ५०००एमएएचची बॅटरीही देण्यात आली आहे. तसेच, या फोनमध्ये ३.५मिमी हेडफोन जॅकदेखील देण्यात आला आहे.

सोबतच, यात ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपदेखील देण्यात आलेला असून, ज्यात बॅक पॅनलवर ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा तर, एक एआय लेन्स व एलईडी फ्लॅशदेखील देण्यात आलेला आहे. तसेच, सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्यात  ३२ मेगापिक्सलच्या कॅमेरा देखील देण्यात आला आहे.(Infotech)

Nagpur | आमदारांना हव्या ‘एसी’ खोल्या; नूतनीकरणावर कोटींचा खर्च


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here