Info-Tech News | Jio-Airtel नाही तर ‘ह्या’ कंपनीने लाँच केला आहे २३ रुपयांचा रिचार्ज

0
27

Info-Tech News | वोडाफोन आयडियाने आपला नवा डेटा व्हाउचर प्लॅन सादर केलेला आहे. ह्या प्लॅनची किंमत फक्त 23 रुपये आहे. हा प्लॅन एका मुख्य सक्रिय प्लॅन सोबत वापरता येतो, त्यामुळे ह्याला वेगळी वैधता नाही.

काय आहे Vi चा २३ रुपयांचा प्लॅन?

VI चा नवीन प्रीपेड पॅक एक डेटा व्हाउचर आलेला आहे. ह्यात कंपनी ग्राहकांना 1.2 जीबी डेटा देत आहे. जर तुमच्याकडे एक सक्रिय रिचार्ज प्लॅन असेल आणि अचानक प्लॅनमधील डेली डेटा संपला तर VI चा 23 रुपयांचा प्लॅन अतिरिक्त डेटा देतो. डेटा व्यतिरिक्त ह्या प्लॅनमध्ये कॉलिंग, एसएमएस किंवा इतर कोणत्याही सर्व्हिसचे बेनिफिट देण्यात आलेले नाहीत.

Crime News | प्रेयसीला पळवून नेत प्रियकराचा लग्नास नकार; नंतर तरुणीचं धक्कादायक कृत्य

या प्लॅनची वैधता तुमच्या मुख्य प्लॅनच्या वैधतेवर अवलंबून असणार आहे. म्हणजे तुम्ही ह्या प्लॅनमध्ये मिळणारा डेटा तोपर्यंत वापरता येईल जोपर्यंत हा डेटा संपत नाही किंवा तुमच्या सक्रिय प्लॅनची वैधता संपत नाही. जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये इंटरनेट जास्त वापरत असाल तर आता ह्या प्लॅनमुळे डेली डेटा लिमिट संपण्याची भीती बाळगण्याची गरज नाही. ह्या प्लॅन व्यतिरिक्त कंपनीकडे आणखी अनेक छोटे डेटा पॅक आहेत.

वोडाफोन आयडियाचा 24 आणि 25 रुपयांचा प्लॅन

वोडाफोन आयडियाच्या लिस्टमध्ये 23 रुपयांच्या आसपास आणखी दोन डेटा प्लॅन्स उपलब्ध आहेत. ज्यांची किंमत 24 रुपये आणि 25 रुपये आहे. विआयचा 24 रुपयांचा प्लॅन फक्त एक तासांच्या व्हॅलिडिटीसह येतो मात्र ह्या एक तासात तुम्ही अनलिमिटेड डेटा वापरू शकतात. तसेच 25 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना एक दिवसाच्या व्हॅलिडिटीसह 1.1 जीबी डेटा मिळतो.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here