World Cup जिंकायचा टिम इंडियाचा चान्स वाढला..

0
25

World Cup | काल भारताचा वर्ल्डकपचा पहिलाच सामना होता. समोर ऑस्ट्रेलिया आणि २०० रन्सचं टार्गेट असताना फसलेली top order. सुरुवातीला सामना जिंकणं अवघड वाटत होतं. पण टीम इंडियाने करून दाखवलं. भारताच्या टीमने ५२ बॉल आणि ६ विकेट्स राखून कालचा सामना जिंकला. काल हिरो ठरले के. एल. राहुल आणि विराट कोहली. या दोघांच्या जोरावर काल भारताने आपला सलामी सामना जिंकला.(World Cup)

Education news: 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा बसणे आवश्यक नाही
कालचा सामना हा चेन्नईच्या एम.एस. चिदंबरम या स्टेडिअमवर खेळला गेला. हे मैदान म्हणजे खेळाडूंसाठी मोठ आव्हान होतं. भारताची फलंदाजी सुरु झाल्यावर पीचचा सूर pace bowling चा दिसला. कालच्या सामन्यात भारताने टॉस हरला आणि पहिले गोलंदाजी करावी लागली.अश्विन, जडेजा आणि कुलदीप अशा तीन स्पिनरच्या जोरावर भारताला गोलंदाजी करावी लागली.पण कालच्या सामन्यात सिराज आणि बुमराह यांनी देखील खरी रंगत आणली. जसप्रीत बुनराह याने दोन फलंदाजांना माघारी धाडलं. मोहम्मद सिराज याने एक विकेट काढली. दरम्यान रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि कुलदीप यादव यांचा समावेश असलेल्या भारतीय फिरकी त्रिकुटाने ऑस्ट्रेलियाला ४९.३ षटकांत १९९/१० धावांवर रोखून भारताच्या खेळला जोरदार मदत केली. जडेजाने 28 धावांत तीन बळी घेतले तर त्यापैकी दोन एकाच षटकात आले. कुलदीपने दोन तर रविचंद्रन अश्विनने एक विकेट घेतली.

ICC World Cup 2023: पावसामुळे भारत-ऑस्ट्रेलिया व्यत्यय येणार ? काय आहे चेन्नईची हवामान स्थिती जाणून घ्या

भारताच्या फलंदाजीची सर्वत्र चर्चा
रोहित शर्माच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनी पराभव केला. वन डे विश्वचषकात भारताने विजयी सलामी दिली. सुरुवातीच्या भारताच्या फलंदाजीच्या कठीण परिस्थितीत विराट कोहली आणि के एल राहुलनं रचलेल्या 165 धावांच्या झुंजार भागिदारीनं भारताला विजय जोरदार मिळवून दिला. विराटनं 116 चेंडूंत सहा चौकारांसह 85 धावांची खेळी केली. के एल राहुलनं 115 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 97 धावांची खेळी केली. त्यापूर्वी भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अख्खा डाव 199 धावांत गुंडाळून घेतला होता. मात्र विराट कोहली आणि के.एल. राहुल यांनी आणखी एक मास्टरक्लासच तयार केला. त्यांच्या प्रयत्नांच्या जोरावर भारताने 200 धावांचे आव्हान 9.4 षटके बाकी असताना पूर्ण केले.

ये सर्व खेळीमुळे भारताच्या टीमचा वर्ल्डकप जिंकण्याचा चान्स वाढलेला दिसतोय. त्यामुळे भारताच्या आगामी सर्व सामने कसे आणि किती रंजक असणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here