Indian Army Day 2024 | आज ‘भारतीय लष्कर दिन’ का साजरा केला जातो..?

0
29
Indian Army Day 2024
Indian Army Day 2024

Indian Army Day 2024 |  १५ जानेवारी हा दिवस आपल्या देशात ‘भारतीय सेना दिन’ म्हणून साजरा केला जातो. मात्र, यामागे नेमका इतिहास काय ? का आजचा दिवस भारतीय सेना दिवस म्हणून साजरा केला जातो. हे आज आपण जाणून घेणार आहोत. (Indian Army Day 2024)

याचे मुख्य कारण म्हणजे या दिवशी, फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांनी जनरल फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय सैन्याची कमान आपल्या घेतली होती. त्यामुळे हा दिवस ‘लष्कर दिन’ म्हणून संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. लष्कर दिनानिमित्त संपूर्ण देश लष्कराच्या शौर्याला आणि शौर्याला सलाम करतो. दरम्यान, आज भारतीय लष्कर ७६ वा स्थापना दिवस साजरा करत आहे. १९४९ मध्ये भारतीय सेना दलाची स्थापन झाली होती. फ्रान्सिस बुचर हे भारताचे शेवटचे ‘ब्रिटिश कमांडर इन चीफ’ होते. या दिवशी प्रथमच भारतीयांवर भारतीय लष्कराची लगाम सोपवली गेली. फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले ‘कमांडर-इन-चीफ’ होते.(Indian Army Day 2024)

Makar Sankranti | मकर संक्रांतीला ‘तीळ’ का देतात..?; कशी सुरू झाली ही पद्धत

करिअप्पा यांनी भारतीय लष्कराच्या सर्वोच्च अशा कमांडर या पदाचा पदभार स्वीकारल्यामुळे हा दिवस देशात लष्कर दिन म्हणून साजरा होतो. फिल्ड मार्शल या पदाची पंचतारांकित रँक मिळालेले करिअप्पा हे पहिले अधिकारी होते. त्यांच्यानंतर दुसरे फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ हे होते. आजच्या या लष्कर दिनानिमित्त संपूर्ण देश हा भारतीय लष्कराचे साहस,  शौर्य आणि बलिदान यांचे स्मरण करतो.(Indian Army Day 2024)

कोण होते के.एम. करिअप्पा..?

कर्नाटकातील कुर्ग येथे १८९९ मध्ये जन्मलेल्या फील्ड मार्शल करिअप्पा यांनी वयाच्या २० व्या वर्षी ब्रिटिश भारतीय सैन्यात काम करण्यास सुरुवात केली. त्यानंत करिअप्पा यांनी १९४७ च्या भारत-पाकिस्तान युद्धात पश्चिम सीमेवर लष्कराचे नेतृत्व केले होते. करिअप्पा यांना ‘कीपर’ म्हणूनही ओळखले जात होते. करिअप्पा हे १९५३ मध्ये लष्करातून निवृत्त झाले. फील्ड मार्शल हे भारतीय लष्करातील सर्वोच्च पद आहे. आदरार्थी म्हणून हे पद दिले आहे.

Nashik | युवा हा देशाची ताकद अभिमान आणि स्वाभिमान – मंत्री दादा भुसे

Indian Army Day 2024 | यंदाची आर्मी डे परेड खास

‘बेस्ट मार्चिंग कंटीजंट’ निवडण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केल्यामुळे यंदाची ‘आर्मी डे परेड’ ही खास ठरली. सर्वोत्कृष्ट मार्चिंग तुकडी ओळखण्यासाठी प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आलेला असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. तसेच, सर्व मार्चिंग तुकडया या कवायती करतात. परंतु ते करण्याचा एक नमुना आहे. आम्ही वैयक्तिक हालचाली या कॅमेरा आणि नंतर संगणकाद्वारे कॅप्चर करण्यात आल्या असून, एआय वापरणारे सॉफ्टवेअरने प्रत्येक हालचालींसाठी गुण दिले आहेत.(Indian Army Day 2024)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here