IND vs AUS Final | वर्ल्ड कपच्या फायनल मधील भारताच्या पराभवामुळे फक्त टीमचंच नाही तर, प्रत्येक भारतीय चाहत्याचंही मन मोडलं आहे. काही लोकांना हा पराभव अत्यंत जिव्हारी लागला. या पराभवामुळे अमरावतीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
भारत पराभूत झाल्यामुळे मोठ्या मुलाने त्याचे वडील व लहान भावावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अंकित इंगोले याचा मृत्यू झाला आहे. तर त्याच्या वडिलांची प्रकृतीदेखील गंभीर असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी, बडनेरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
Nashik news | सभांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे नागरिकांना आवाहन
नशेत वाद झाला आणि भावाचा जीव घेतला
अमरावतीच्या जवळ असलेल्या अंजनगाव बारी ह्या गावात ही घटना घडली आहे. प्रवीण इंगोले असे (वय ३२) आरोपीचे नाव आहे. मयत तरूणाचे नाव अंकित इंगोले (वय २८) असे आहे तर, रमेश इंगोले असे त्यांच्या वडिलांचे नाव असून तेदेखील गंभीर जखमी आहेत.
रविवारी रात्री हे तिघे घरात वर्ल्डकप फायनल मॅच बघत होते त्यावेळी ते मद्यपानही करत होते. पण, भारत हरला व मॅच संपली. दरम्यान, क्रिकेट मॅच हरल्यामुळे त्यांच्यात आपापसात वाद सुरू झाला. तुम्ही मटण खाऊन आले त्यामुळे भारत हरला, असे सांगत नशेत आरोप प्रवीण याने लहान भाऊ व वडिलांना शिवीगाळ केली.
Crime News | कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पसार
त्याच्या वडिलांनी त्याचा मोबाईल खेचून घेतला व मोबाईल त्याला मारला. त्यामुळे आरोपीने रागाच्या भरात घरातून लोखंडी सळी आणली व त्याचा लहान भाऊ अंकित याच्यावर जीवघेणा हल्ला केला. तसेच त्याच्या वडिलांनाही मारहाण केली.
या हल्ल्यात अंकित हा गंभीर जखमी होऊन खाली कोसळला व त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे वडील रमेश इनगोळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, वडिलांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी भांदवि ३०२, ३०७ यानुसार आरोपी प्रवीण इंगोले याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे.
Nashik news | सभांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे नागरिकांना आवाहन
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम