T20 विश्वचषक 2022 चा हंगाम सुरू आहे. पण, यादरम्यान बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी जबरदस्त ताकद दाखवत भारताचे एक नाही तर चार संघ जाहीर केले आहेत. न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी या संघांची निवड करण्यात आली आहे. या दोन संघांविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय वेगवान त्रिकुटाची निवड करण्यात आली आहे.
उमरान मलिक– 2022 मध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळताना दिसेल अशी अपेक्षा होती. तसे झाले नाही. पण आता त्याची प्रथमच भारताच्या एकदिवसीय संघासाठी निवड झाली आहे. याआधी उमरान भारताच्या केवळ टी-२० संघाचा भाग होता. तो आतापर्यंत 3 टी-20 खेळला आहे, ज्यामध्ये त्याने 2 विकेट घेतल्या आहेत. उमराणची ताकद म्हणजे त्याचा वेग आहे.
कुलदीप सेन– मध्य प्रदेशचा गोलंदाज कुलदीप सेनची ताकद म्हणजे उमरान मलिकसारखा वेग. तोही त्याच्यासारखा उजव्या हाताचा गोलंदाज आहे. आणि उमरान मलिकप्रमाणेच न्यूझीलंडसाठी निवडलेल्या वनडे संघात त्याचाही समावेश करण्यात आला आहे.
यश दयाल– उत्तर प्रदेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज देखील प्रथमच वनडे संघासाठी निवडला गेला आहे. मात्र उमरान आणि कुलदीप सेनप्रमाणे त्याची न्यूझीलंड नव्हे तर बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली आहे.
वेगवान या त्रिकुटाशिवाय फलंदाज शुभमन गिलची प्रथमच टी-२० संघात निवड झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला ही संधी मिळाली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम