मुंबई : मोहालीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज फलंदाजी करत २०९ धावांचे लक्ष्य सहज गाठले. ज्यामुळे टीम इंडियाचा ४ विकेट्सने पराभव झाला आहे.
आजपासून तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील आज पहिला सामना होता. यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजीला उतरताना भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा(११) व विराट कोहली(२) स्वस्तात तंबूत परतले. पण त्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने केएल राहुलसोबत डाव सावरला. व दोघांनी दमदार फलंदाजी करत धावसंख्या १०० पार नेली. पण अर्धशतक करुन के एल राहुल बाद झाला. त्याच्याबरोबर सुर्याकुमारही ४६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने फलंदाजीची धुरा आपल्या हाती घेत एकहाती तुफान फलंदाजी केली. व ३० चेंडूत नाबाद ७१ धावा ठोकल्या. ज्यामुळे संघाची धावसंख्या २०८ पर्यंत नेत ऑस्ट्रेलियासमोर २०९ धावांचे आव्हान ठेवले.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ मोठे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आला असता त्यांची सुरुवातही चांगली झाली. पण ३९ धावांवर कर्णधार आरॉन फिंच बाद झाला. पण त्यानंतर ग्रीनने स्टीव स्मिथसोबत धडाकेबाज फलंदाजी सुरु ठेवली. कॅमेरून ग्रीनने ६१ धावा करुन आपले पहिलेवहिले अर्धशतक साजरे केले. स्मिथही ३५ धावांवर बाद झाला. पण मॅथ्यू वेडने ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे शेवटच्या षटकातील ४ चेंडू राखून ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. भारताकडून अक्षर पटेलने ३ तर उमेश यादवने २ विकेट घेत चांगली झुंज दिली.
कॅमेरून ग्रीन या सामन्यात सामनावीर ठरला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम