नाशिक शहरात डेंग्युचा वाढता कहर; प्रशासन आलं अलर्ट मोडवर

0
31

Dengue Disease | नाशिक शहरात ऑक्टोबरमध्ये डेंग्युचे तब्बल 193 रुग्ण आढळून आले असून खासगी रुग्णालयातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचार घेते आहेत. शहरात डेंग्यु बाधितांचा आकडा 175 वर पोहोचला आहे.

Deola | तालुक्यात कालव्याच्या पाण्यावरून होऊ शकतं ‘तिसरं महायुद्ध’

शहरात ऑक्टोबरमध्ये डेंग्यू तब्बल 193 रुग्ण आढळून आलेले असून नाशिक रुग्णालयात रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचार घेत आहेत. शहरात डेंग्यु बाधितांचा आकडा 715 वर पोहोचला आहे.

नाशिक रोड आणि सातपूर विभागात सर्वाधिक डेंग्यु रुग्ण आढळून आलेले आहे. महानगरपालिकेच्या मलेरिया विभागाने डेंग्यु निर्मूलन मोहीम युद्धपातळीवर राबवण्यास सुरुवात केली असली तरी त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही आहे. एक हजार 12 ठिकाणी डासांची उत्पत्ती ठिकाणे आढळल्याने त्या घरे, आस्थापनांना मलेरिया विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. जानेवारीत 17, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये प्रत्येकी 28, एप्रिलमध्ये 8, मेमध्ये 9, जूनमध्ये 26, जुलैत 144, तर ऑगस्टमध्ये 117, सप्टेंबरमध्ये 1066 संशयित आढळले आहे. त्यातील 261 रुग्णांचा डेंग्यु अहवाल पॉझिटिव्ह आला.

chandwad| चांदवडमध्ये हुंडाबळी..; त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

विभागनिहाय बाधितांची स्थितीविभाग डेंग्यू बाधितपूर्व-

29 पश्चिम 13 नाशिक रोड 46 सिडको

31 पंचवटी 32 सातपूर 42 एकूण 193

 

आठवड्याभरात डेंग्यूचे समूळ उच्चाटन करा; पालकमंत्र्यांचे यंत्रणेला निर्देश

मलेरिया आरोग्य अधिकारी त्र्यंबके आणि डॉ. तानाजी चव्हाण यांच्या सोबत बैठक घेत कडक अमलबजावणीसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहे. यावेळी जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आदि पदाधिकारी उपस्थित होते. डेंग्यू आजाराच्या साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने ही चिंताजनक परिस्थिती आहे. नागरिकांनी देखील आपल्या घरात परिसरात स्वच्छ्ता बाळगावी असे आवाहन पालकमंत्री भुसे यांनी केलेले आहे. आजारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी आढळलेल्या 1012 मिळकतधारक, संस्था, खासगी तसेच शासकीय कार्यालयांना महापालिकेच्या मलेरिया विभागामार्फत नुकतेच नोटिस देखील बजावण्यात आल्या आहेत.

नाशिककरांनी कोरडा दिवस पाळून डेंग्यूचे समूळ उच्चाटन करण्याचे आवाहन देखील दादा भुसे यांनी यावेळी नागरिकांना केले आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना शहरात जनजागृती करणे, शहरात फवारणी करणे, डासांच्या अळ्या नष्ट करणे, प्रत्येक प्रभागात कॉलनीत जनजागृतीपर सूचना फलक लावणे, डेंग्यूचे लक्षण आणि काळजी कशी घ्यावी याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शहरात काही ठीकणी डपके अथवा टायर पडीक असतील त्याच्यात पाणी असल्यास त्यांचा नायनाट करण्याची सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केली आहे.‍

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here