Nashik Crime| नाशिकच्या निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात अवैध गौण खनिज माफियांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पण, संबंधित महसूल विभाग ह्या सर्व प्रकाराबाबत फक्त बघ्याचीच भूमिका घेत असल्याने नागरिक मात्र संताप व्यक्त करत आहेत.
निफाडच्या गोदाकाठ परिसरात अवैध गौण खनिज माफियांचा सुळसुळाट झाला आहे. अवैध गौण खनिजाचे उत्खनन आणि वाहतूक ही रात्रभर सुरूच असते. अगदी राजरोसपणे माती, आणि मुरुमाचा अमाप उपसा सुरू आहे. गौण खनिजाचे असे बेदरकारपणे उत्खनन होत असताना महसूल अधिकारी, कर्मचारी मात्र काहीही कारवाई करीत नाहीत, हे मात्र विशेष.
गोदाकाठ परिसरातील महाजनपूर, पिंपळगाव निपाणी ह्या आणि अशा इतर ठिकाणांहूनही माती, मुरूम मोठ्या प्रमाणात उचलण्यात येत आहे.
तसेच, महाजनपूर, पिंपळगाव निपाणी, तळवाडे अशा भागात मुरुमाचे उत्खनन बेदरकारपणे सुरू आहे. गौण खनिज माफियांची मोठी टोळी या परिसरात सर्रासपणे कार्यरत आहे. महसूल विभाग कारवाई करीत नसल्यामुळे नेमके या मागचे गौड काय आहे, की महसूल विभागाचाच यांच्यावर वरदहस्त आहे? असा प्रश्न यानिमित्ताने सर्वांनाच पडला आहे.
मराठा आणि कुणबी एकच, सरसकट आरक्षण द्या! सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षनेते आक्रमक
अवैध गौण खनिज चोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गाव पातळीवर तलाठी, आणि मंडलाधिकारी प्रतिनिधी म्हणून काम बघत असतात. गौण खनिजावर लक्ष ठेवणे आणि गौण खनिजाबाबतचा अहवाल तहसील कार्यालयात दाखल करणे हे तलाठ्यांचे काम आहे.
अवैध वाहतूक करणाऱ्या ह्या वाहनांमुळे परिसरातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ओव्हरलोड व सुसाट चालणारी वाहने नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. तसेच, वाहनांवर नंबर नसल्यामुळे वाहन ओळखणेही अवघड होत असते. अवैध खनिज माफियांमध्ये अंतर्गत काही हितसंबंध असून, तेच अधिकाऱ्यांना आर्थिक लाभ उपलब्ध करून देत नाहीत ना? असा प्राशनही यानिमित्ताने उपस्थित होतो.
गोदाकाठ भागात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त असून, त्याला आर्थिक संबंधही जोपासले जात असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. दरम्यान, एक खासगी व्यक्ती हे सर्व कलेक्शन करून पाकीट संबंधितांना पोहोच करीत असल्याची चर्चाही आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणीही होत आहे.
कारवाई करणार का..?
गोदाकाठ परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक झाली आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा हे ॲक्शन मोडवर येऊन या प्रकरणी ठोस कारवाई करतील का? हे बघाव लागणार आहे.
DS Baba: ‘तुझा देवळा आता तालुका झाला’…; आठवणीतील डॉ. डी. एस. बाबा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम