Skip to content

Crime update : अवैध दारु तस्कराचा सिनेस्टाइल पाठलाग करत ठोकल्या बेड्या


Crime update  अवैध रित्या दारू वाहतुक करत असलेल्या एका संशयीत आरोपीस अटक करून त्याच्या कडून सुमारे ६३ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात सटाणा पोलिसांना यश आले आहे.

या बाबत समजलेली हकिकत अशी कि, सटाणा येथिल सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील व त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंग राजपुत हे भाक्षी रोड वर आपल्या खाजगी वाहनावर गस्त घालत असताना एक मोटारसायकल स्वार ( MH 41 AE 3915 ) या दुचाकी वर भरधाव वेगाने मुळाणे गावाच्या दिशेने जात होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील यांना या बाबत संशय आला असता त्यांनी त्या दुचाकी चा सिनेस्टाईल पाठलाग करून भाक्षी गावाच्या पुढे सदरची दुचाकी अडवली व त्या इसमाची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर त्यांनी गाडीची तपासणी केली असता त्यात देशी दारूच्या अवैध रित्या विक्री साठी घेवून जात असलेला सुमारे ६३ हजार रुपये किमतीचा ऐवज मिळवून आला.

संशयीत आरोपी समाधान मोरकर यास सटाणा पोलीसांनी अटक केली असून त्याचा विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सटाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी आपली दमदार कामगिरी सुरुच ठेवली असुन प्रभारी अधिकारी चिलूमुला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जिभाऊ पवार, रुपेश ठोके, राजेंद्र जगताप, बाळासाहेब टिळेकर, पोलीस नाईक वाडीलाल जाधव, जगताप, पोलीस कर्मचारी अशोक चौरे, हरि शिंदे, रवि शिंदे, सिकंदर कोळी यांनी सक्रीय सहभाग घेतला

या कारवाई चे जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलीस अधीक्षक चिलूमुला रजनीकांत, पोलीस उप अधिक्षक पुष्कराज सुर्यवंशी यांनी कौतुक केले आहे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!