Ganeshotsav breaking : गणेश भक्तांसाठी खुशखबर ; शासकीय गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांना मिळणार इतक्या लाखांचे बक्षीस


Ganeshostav breaking :दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात अली आहे. राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्य शासनाने स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठी जवळपास पाच लाख रुपयांचे बक्षीसही शासनाकडून मंडळास दिले जाणार आहे.

यंदा अधिक मास असल्याने गणेशोत्सव उशिराने येणार आहे. मात्र तयारी आतापासूनच सुरु झाली आहे. राज्यात 19 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच, अडीच आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांवरील मंडळांना अनुक्रमे पाच, अडीच आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी प्रधान सचिव खारगे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून या कॉन्फरन्ससाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ उपस्थित होते. यावेळी खारगे यांनी राज्यात सन 2022 मधील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार दिले होते. त्या अनुषंगाने सन 2023 मध्ये राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. त्यासाठीचा निधी व या पुरस्कारसाठीचे निकष याबाबतीत शासन निर्णय जारी केला आहे. या पुरस्कारासाठीच्या 24 लाख 60 हजाराच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.

नियम, अटी व नोंदणी पद्धत खालीलप्रमाणे

स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक मंडळांना सहभागी होता येईल. स्पर्धेत पर्यावरणपूरक मूर्तीसाठी 10 गुण, पर्यावरणपूरक सजावट 15 गुण, ध्वनीप्रदूषणरहित वातावरणासाठी 5 गुण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन आदी समाजप्रबोधन, सामाजिक सलोख्यासंदर्भातील सजावट देखाव्यासाठी गुण 20 स्वातंत्र्य व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट, देखाव्यास 25 गुण असतील.

मंडळाने रक्तदान शिबिर आदी सामाजिक कार्यासाठी 20 गुण अशा 150 गुणांची ही स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेल आयडीवर 10 जुलै ते 5 सप्टेंबर 2023 या कालावधीत नोंदणी करावी.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!