Igatpuri | धरणांच्या तालुक्यातच टँकरद्वारे पाणीपुरवठा; भाम कोरडे तर, भावलीत १% पाणीसाठा

0
24
Igatpuri
Igatpuri

राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद |  सात मोठे जलप्रकल्प असलेल्या इगतपुरी तालुक्यात उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात 15 टँकरद्वारे एकूण 16 गावे व 48 वाड्यांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. (water shortage) धरणांच्या तालुक्यातच तसेच जवळपास अर्ध्या महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातच वाड्या पाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. कुठे गेल्या शासनाच्या जलजीवन योजना, आणि कधी येणार नळाद्वारे घरापर्यंत पाणी..? असा सवाल आदिवासी वाड्यापाड्यातील महिला वर्गाकडून केला जात आहे. ‘हर घर नल का जल’ हेच आहे का..? सरकारचे जलजीवन मिशन सफल झाले का..? असा सवाल संतप्त नागरिकांकडून केला जात आहे.(Igatpuri)

मिळालेल्या माहितीनुसार इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील भाम धरणातील जलसाठा संपुष्टात आला असून, आता मृत जल साठ्यावर येथील जलाशयाची मदार आहे. तर भावली धरणात अवघा एकच टक्के साठा शिल्लक राहिल्याने पावसाला विलंब झाला तर तालुक्यातील अनेक गावांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. विशेष व उल्लेखनीय बाब म्हणजे धरणालगत असलेल्याच वाड्या पाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असून, उशाशी असलेल्या धरणात पाणी दिसत असतानाही वाड्यापाड्यांना मात्र टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

भाम धरणालगत (Bham Dam) असलेल्या मांजरगावच्या दोन वाड्या भरवज निरपनची वाडी, काळूस्तेची दरेवाडी, त्रिंगलवाडीचा बंधारा रिकामा झाल्याने त्रिंगलवाडीसह पाच वाड्यांना याबरोबरच वाकी धरणालगत असलेल्या वाळविहीर परिसरातील सहावाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. याबरोबरच खैरगावच्या दोन वाड्या शेवगेडांग दोन वाड्या, कुरुंगवाडीची एक वाडी, आंबेवाडीच्या दोन वाड्या, बलायदुरीची एक वाडी वासाळीची एक वाडी, आवळखेड, बळवंतवाडी तसेच गरुडेश्वरच्या चार वाड्या, मायदरासह दोन वाड्या, खेडच्या दहा वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

Igatpuri | वीटभट्टी व्यावसायिकांनाही अवकाळीचा फटका; मोठे आर्थिक नुकसान

टँकरमुक्त तालुका व हंडामुक्त गावे कागदावरच..?

इगतपुरी तालुक्यात 15 टँकरद्वारे 41 फेऱ्यांच्या माध्यमातून 16 गावे व 48 वाड्यांना पिण्याचे पाणी पुरविले जाते असल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान दरवर्षी यातील बहुतांश वाड्यापाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे टँकरमुक्त तालुका व हंडामुक्त गावे ही संकल्पना, घोषणा कागदावर आहेत की काय..? असा सवाल व्यक्त होत आहे. या वाड्या पाड्यांना जलजीवन योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी योजना राबविण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सकारात्मक पुढाकार घेणे अपेक्षित आहे.

भाम धरणातील जलसाठा संपुष्टात

तालुक्यातील सर्वच धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली होती. त्यात कालांतराने रोटेशनच्या माध्यमातून बहुतांश धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे धरणातील बहुतांश जलसाठा कमालीचा घटला होता. आज स्थितीत तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या भाम धरणातील जलसाठा संपुष्टात आला असून आता मृत साठ्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. तर भावली धरणात (Bhavali Dam)अवघा एक टक्के जलसाठा शिल्लक राहिल्याने आगामी काळात पावसाने विलंब केला तर तालुक्याची चिंता वाढण्याची शक्यता आहे. तसेच कडवा प्रकल्पातही केवळ ९ टक्के पाणी शिल्लक आहे.(Igatpuri)

Kajwa Mahotsav | वन्यजीव विभागाचा निर्णय; काजवा महोत्सवाला रात्री ९ नंतर प्रवेश नाही

Igatpuri | प्रमुख धरणातील जलसाठा 

  1. भाम – रिक्त
  2. भावली – १.५३%
  3. कडवा – ९.४८%
  4. वाकी – १४.१३%
  5. मुकणे – १५.३९%
  6. दारणा – २३.३५%

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here