Igatpuri | टाकेद ग्रामपंचायतीच्या महिला ग्रामपंचायत सदस्यासह पत्रकाराला मारहाण

0
2
Igatpuri
Igatpuri

Igatpuri |  इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रुप ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद येथील इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे उपतालुकाप्रमुख राम शिंदे आणि त्यांच्या आई टाकेद ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्या नंदाबाई भास्कर शिंदे यांना गुरुवारी (दि. १२) रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास गावातीलच संशयित आरोपी शहाबाज शेख याने मारहाण केली. राम शिंदे यांना मारहाण होत असल्याचे बघून त्यांचे कुटुंबीय मध्ये पडले असता सदर इसमाने ग्रामपंचायत सदस्या नंदाबाई शिंदे यांना जातीवाचक आणि अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांचे पती भास्कर शिंदे यांनाही धक्काबुक्की केली. यानंतर शिंदे कुटुंबीयांनी तात्काळ घोटी पोलीस ठाणे गाठले व सर्व घटना पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना सांगत गुन्हा दाखल केला.

Igatpuri | नेमकं प्रकरण काय..?

सोशल मीडियावर गावातील विकासकामांच्या श्रेयवादावरून झालेल्या किरकोळ वादातून संशयित शहाबाज शेख याने मद्यधुंद अवस्थेत रात्री साडेबाराच्या सुमारास शिंदे यांच्या घरी जाऊन शिवीगाळ व दमदाटी केली. रात्री शिंदे यांनी घराचा दरवाजा उघडला नसल्याने सदर इसमाने सकाळच्या सुमारास राम शिंदे यांना काहीही न सांगता मारहाण चालू केली. त्यांचे कुटुंबीय मध्ये पडले असता त्यांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचे शिंदे कुटुंबीयांनी सांगितले आहे.

Igatpuri | छत्रपती शिक्षण मंडळाकडून टाकेद कातकरी वस्तीतील कुटुंबांची दिवाळी गोड

“मी गेल्या दहा वर्षांपासून निस्वार्थ समाजकार्य करत असून गाव व परिसरातील गावगुंडांना ते बघवत नाही म्हणून गेल्या वर्षभरापासून मला सातत्याने ब्लॅक मेल करणे, एकट्याला गाठून दमदाटी करणे, शिवीगाळ करणे असे प्रकार केले जात  आहेत. त्यामुळे मला व माझ्या आईला योग्य तो न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. – राम शिंदे, (पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते, टाकेद बु)

“मला व माझ्या मुलाला मारहाण करण्यात आली. यामागे गावातील काही राजकारण्यांचा हात आहे. गावचे प्रश्न ग्रामसभा ग्रामपंचायतमध्ये मांडायचे सोडून शहाबाज शेख याने माझ्या घरी येत एका महिला ग्रामपंचायत सदस्यावर हात उचलला हे लोकशाहीला अशोभनीय आहे. माझ्या मुलासह माझे कुटुंबियाच्या जीविताला धोका आहे. याची पोलिसांनी योग्य चौकशी करावी व मला योग्य तो न्याय द्यावा”.  – सौ नंदाबाई भास्कर शिंदे, (ग्रामपंचायत सदस्या टाकेद बु.)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here