Igatpuri | आता शिधापत्रिका काढण्यासाठी व दुरुस्तीसाठी तहसील कार्यालयाच्या चकरा बंद

0
122
#image_title

Igatpuri | सद्यस्थितीत बहुतांश शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी नागरिकांना शिधापत्रिका बाळगणे जरुरी झाले आहे. परंतु अधिकांश वेळेस तहसील कार्यालयातून शिधापत्रिका काढण्यासाठी बराच वेळ लागतो व नागरिकांना नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी अथवा शिधापत्रिकेच्या नाव वाढ कमी करणे व इतर कामासाठी तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. यासाठी शासनाने नागरिकांचा त्रास कमी व्हावा याकरिता शासनाचे mahafood.gov.in या संकेत स्थळावर public log-in इन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे आता नागरिक घरी बसल्या शिधापत्रिकेसाठी व शिधापत्रिकेबाबत इतर कामांसाठी अर्ज करू शकतात त्यासाठी फक्त आपल्या आधारकार्ड वर आपला भ्रमणध्वनी संलग्न केलेला असणे जरुरी आहे. या कामांसाठी संगणक बद्दल माहिती नसणारे नागरिक आपल्या गावातील ग्राहक सेवा केंद्र किंवा सेतू केंद्र यांची मदत घेऊ शकतात.

Igatpuri | घोटी पोलीसांची धडक कारवाई देवाची वाडी येथील गावठी दारू भट्टी उध्वस्त

नागरिक दलाल व्यक्तींच्या कचाट्यातून मुक्त 

तसेच शासनाने ई-शिधापत्रिका प्रणाली अस्तित्वात आणली असून त्याद्वारे शिधापत्रिका धारकांना कुठल्याही संगणक केंद्रातून आपली शिधापत्रिका प्रिंट करून घेता येणार आहे. तरी सर्व शिधापत्रिका धारकांनी शासनाने पुरवलेल्या या सुविधेचा लाभ घ्यावा. शासनाने पुरविलेल्या या सुविधेमुळे बऱ्याच अंशी नागरिक दलाल व्यक्तींच्या कचाट्यातून मुक्त होतील व त्यांची पैशाची बचत ही शक्य होणार आहे.

“इगतपुरी तालुक्यातील शिधापत्रिका धारकांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे public log इन वर जाऊन शिधापत्रिकेच्या प्रश्नांसाठी अर्ज करावेत व या सुविधेचा लाभ घ्यावा.”

– ललित पाटील, पुरवठा निरीक्षण अधिकारी, इगतपुरी तहसील


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here