Igatpuri | इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रुप ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद येथील आदिम कातकरी वस्तीतील ग्रामस्थांना मुंबई मांडा टिटवाळा येथील छत्रपती शिक्षण मंडळाचे पूर्व प्राथमिक विद्या मंदिर शाळेच्या स्टाफच्या वतीने दिवाळी फराळ, जीवनावश्यक वस्तूसंह प्रत्येकी एक साडी असे वस्तूंचे वाटप करण्यात आले. दरवर्षी टिटवाळा येथील पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या वतीने ग्रामीण भागातील आदिवासी वाड्या पाड्या वस्त्यांमध्ये दिवाळी फराळ, कपडे, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत असते.
याच धर्तीवर याही वर्षी छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेच्या पूर्व प्राथमिक विद्यामंदिर या शाळेवर कार्यरत असलेल्या व सर्वतीर्थ टाकेद मायभूमीतील संघर्ष कन्या शारदा सगभोर(धादवड) यांचे संकल्पनेतून सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली व शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता चौधरी यांचे सर्व टीमच्या वतीने टाकेद बु. येथील जवळपास ४८ कुटुंबाची लोकवस्ती असलेल्या कातकरी समाजबांधवांना एकूण वीस जीवनावश्यक वस्तू यामध्ये सर्व घरगुती वापरातील किराणा व दिवाळी फराळ यांचेसह प्रत्येकी एक साडी अश्या सर्व किटचे वाटप करण्यात आले.
Igatpuri | आता शिधापत्रिका काढण्यासाठी व दुरुस्तीसाठी तहसील कार्यालयाच्या चकरा बंद
याप्रसंगी छत्रपती शिक्षण मंडळाचे पूर्व प्राथमिक विद्या मंदिर मांडा टिटवाळा येथील सर्व महिला शिक्षक शिक्षेकत्तर कर्मचारी वृंद विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका नम्रता चौधरी व टीमने मनोगत करत परिचय दिला व सर्व आदिम कातकरी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. तर टाकेद गावच्या वतीने सामाजिक कार्यात कायम झोकून देऊन कार्यरत असलेले पत्रकार राम शिंदे यांनी सर्व शाळेचे सर्व शिक्षक पालकवर्ग यांचे ग्रामस्थांच्या वतीने मनोगतात आभार मानले. स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर पहिल्यांदा आदिवासी दुर्गम भागातील आदिम कातकरी समाजबांधवांची पहिली दिवाळी ही छत्रपती शिक्षण मंडळाच्या पूर्व प्राथमिक विद्या मंदिर शाळेच्या वतीने खऱ्या अर्थाने गोड झाली असल्याचे राम शिंदे यावेळी म्हणाले.
याप्रसंगी छत्रपती शिक्षण मंडळाचे पूर्व प्राथमिक विद्या मंदिर मांडा टिटवाळा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नम्रता दिनेश चौधरी, सहशिक्षिका श्रीमती प्रतिभा भोसले, सौ. आशा पंडित, श्रीमती शारदा सगभोर, सौ. छाया पंडित, सौ. मनिषा पवार, सौ. मोनिका जाधव, सौ. शेफाली पवार, सौ. संजीवनी पवार, सौ. पल्लवी मनोहर, सौ. मनाली पाटील, सेविका सौ. मिनाक्षी केळस्कर, सौ. स्मिता जाधव, सौ. विद्या गुरव, सौ. सुषमा नाडकर आदींसह टाकेद येथील निलेश गायकवाड यांच्यासह बहुसंख्य आदिम कातकरी समाज बांधव ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
Igatpuri | घोटी पोलीसांची धडक कारवाई देवाची वाडी येथील गावठी दारू भट्टी उध्वस्त
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम