Igatpuri | इगतपुरीत मतदानाबद्दल उदासीनता; राजकीय भूमिकांचा परिणाम  

0
44
Igatpuri
Igatpuri

राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद | नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील असून यंदा होत असलेल्या लोकसभा निवडणूकित येथील मतदारांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. यावर्षी मतदारांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उत्सुकता नसल्याचे निदर्शनास येत आहे.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात येत्या २० मे रोजी मतदान होणार असून, यासाठी दोन्ही मतदार संघातील सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे. इगतपुरी तालुका हा दुर्गम भाग असला तरीही येथे मतदारांची संख्या अधिक आहे. मात्र, पाणी प्रश्न, पायाभूत सोयींचा प्रश्न यासाठी इच्छित कामे न झाल्याने व रोजच्या राजकीय हेवेदाव्यांना कंटाळल्याने येथील मतदारांमध्ये या निवडुकीत उदासीनता आहे.

Igatpuri | सार्वजनिक विहिरीतील पाणी गायब; महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या

मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम..?

तालुक्यामध्ये राजकीय वातावरणाच्या हिशोबाने सर्वच राजकीय पक्ष प्रचार करण्यासाठी पुढे सरसावले असले तरी मतदारांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीबाबत फार काही उत्सुकता नसल्याचे जाणवत आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम तालुक्यातील मतदान आणि मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता असल्याची भीती इगतपुरीसह नाशिकमधील राजकीय विश्लेषकांना आहे.

Road Damage | रस्त्यांची झाली चाळण; सर्वतीर्थ टाकेदचा खोळंबला विकास

तालुक्यात राजकीय नेत्यांची सभा नाही 

गेल्या निवडणुकीत मित्र पक्ष असलेले. यावर्षी विरोधात असून मागील वर्षी जे पक्ष विरोधात होते. ते यावर्षी एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या सर्व घटकांचा मतदाराच्या विचारसरणीवर परिणाम होत असून, यावर्षी जाणवणारा प्रचंड उकाडा हा सुद्धा मतदानावर परिणाम करण्यास एक कारण ठरण्याची शक्यता आहे. तसेच तालुक्यात एकाही मोठ्या राजकीय नेत्याची सभा न झाल्यानेही वातावरण थंडावले आहे. तरी या सर्व घटकांचा मतदानावर काय परिणाम होईल..?  हे येत्या २० मे ला कळेलच.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here