राज्यातील ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदली; नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओपदी आशिमा मित्तल

0
117

नाशिक : राज्य सरकारने काल मध्यरात्री राज्यातील ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर आशिमा मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नाशिकचे सहाय्यक जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची जालना येथे बदली झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या सध्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या लीना बनसोड यांची ठाण्याच्या आदिवासी अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. आता त्यांच्या जागी पालघरच्या सहायक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे.

त्याचसोबत सहायक जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची जालनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. तर सहायक जिल्हाधिकारी व आयटीडीपी प्रकल्प अधिकारी विकास मीना यांची औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती राज्य सरकारने केली आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here