Devendra fadanvis| मी ब्राह्मण म्हणून सॉफ्ट टार्गेट; देवेंद्र फडणवीस यांचे धक्कादायक खुलासे

0
26

Devendra fadanvis| राजकारणात तुमची शक्ती वाढवण्यासाठी कोणी येत असेल तर त्यांना का घेऊ नये? राष्ट्रवादी आमच्याकडे २०१९ लाच येणार होती. स्थिर व चांगलं सरकार हे उद्धव ठाकरेंसोबत येऊ शकतच नाही हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांना आमच्यासोबत आधीपासूनच यायचं होतं. प्रस्ताव आणि कागद घेऊन कोणी येत नसतं.  राज्यात काहीही घडलं की, विरोधकांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच का टार्गेट केलं जातं? यावर खुद्द त्यांनीच स्पष्ट वक्तव्य केलं आहे. मराठा समाजाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या लोकांनीच तुम्ही काय केलं? असं विचारायला सुरुवात केली. यांना माझी जात माहीत आहे. मी ब्राह्मण आहे. माझी जात बदलण्याचं काही कारणही नाही. त्यामुळे हा सॉफ्ट टार्गेट आहे असं त्यांना वाटतं. असं धक्कादायक विधान देवेंद्र फडणवीस यांनी एक मुलाखतीत केलं आहे

 नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे, पण…

ज्या वर्षाला निघणाऱ्या नोकऱ्या आहेत, त्या मिळाल्याच पाहिजे. त्यामुळे अण्णासाहेब आर्थिक महाविकास महामंडळ आम्ही बळकट केलं आहे. त्यातून ५० हजार कोटींचं कर्ज दिलं. ७० हजार उद्योजक उभे राहिले. त्यांनी दोन लोकांना रोजगार दिला असेल तर २ लाख तरुणांना रोजगार मिळाला असेल. आम्ही सारथी संस्था सक्षम केली. इंजिनीयर व मेडिकल कॉलेजात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के जागा देण्याचा प्रयत्न केला. त्यांना हॉस्टेलची सुविधाही दिली. त्यामुळे सामान्य लोक त्यांना तुम्ही ३७ वर्षात काय केलं असं विचारत आहेत. म्हणूनच मला विरोधक टार्गेट करत आहेत, असंही ते म्हणाले.

दादा करेक्टच… 

यावेळी देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांचा एक विडियो दाखवण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस दिल्लीला गेले. त्याबद्दल अजित पवारांना विचारण्यात आलं असता त्यांनी “मला विचारून गेले का?” असा उलटप्रश्न  केला. त्यामुळे याबाबत अजित पवारांना विश्वासात घेत नसल्याची चर्चा रंगली. त्यावर फडणवीस म्हणाले की,

दादा काय चुकीच बोलले? पहिली गोष्ट हा अर्थ मीडियाने काढला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कुठे गेले हे मला माहीत नाही हे दादांनी सांगितलं. दादांशी संबंधित काही विषय असता तर ते आमच्यासोबत आले असते. समजा, शिंदे यांच्या शिवसेनेची केस सुरू आहे. राष्ट्रवादीची केस सुरू आहे. शिवसेनेच्या केस बाबत आम्हाला वकिलांशी काही चर्चा करायची असेल त्या संदर्भात काही निर्णय असेल,किंवा काही डावपेच ठरवायचे असतील तर, त्यात अजितदादांचे कामही नाही.

दादा कंफर्टेबल… 

मीडिया नेत्यांना प्रश्न विचारतात. तुमचा माईक चालू आहे किंवा नाही हे आम्हाला माहीत नसतं. त्यावेळी आम्ही काही बोलत असलो तर तुम्ही त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ काढता. आता दिवसभरात अजितदादा काय करतात हे मला माहीत नसतं. मी काय करतो हे त्यांना माहीत नसतं. मुख्यमंत्री दिवसभर काय करतात ते आम्हाला सांगून करत नाहीत. जिथे तिघांना एकत्र येण्याची गरज असेल तिथे एकत्र येतो. दादा आमच्यासोबत कंफर्टेबल आहेत. तुम्ही त्यांनादेखील विचारा, असंही ते यावेळी म्हणाले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here