पत्नीच्या प्रियकराने केला पतीवर हल्ला! नुकतेच झाले होते लग्न

0
28

The point now – Swati kadam

ही भयानक घटना मध्य प्रदेशातील अंबाडा तालुक्याची आहे.(जिल्हा बऱ्हाणपूर) आठ दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर पत्नीच्या प्रियकराने पतीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे त्या महिलेचे पती हे गंभीर जखमी झालेले आहेत.

याची तक्रार रात्री उशिरा करण्यात आली असून त्या व्यक्तीच्या पत्नीला आणि तिचा प्रियकरराला पोलिसांनी ताबडतोब अटक केले आहे. अरविंद रवींद्र सुलताने यांचे वय वर्ष 23 असून त्यांचावर हल्ला करण्यात आला अशी तक्रार त्यांनी नोंदवली त्यांनी सांगितले की गेल्या आठ दिवसांपूर्वी आमचं लग्न झालं होतं काकोडा येथे राहणारी वर्षा बघे या मुलीशी मी लग्न केले होते काही दिवसांनी तिला सासरी घेऊन जात असताना रस्त्यातच आमची मोटार सायकल बंद पडली आणि त्यामुळे आम्ही एका जागी थांबलो.

पण त्याच ठिकाणी वर्षा बघे (पत्नी) चा प्रियकर आधीच पोचला होता आणि त्याने अरविंद सुलताने यांच्या डोक्यावर जोरदार दांड्याने हल्ला केल्याने ते तिथे जखमी झाले. त्यांना खूप जोरात मार लागल्यामुळे त्यांना जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना घडल्यामुळे सर्वत्र याची चर्चा आहे त्याच दरम्यान पोलिसांनी पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे आणि पुढचा तपास ही सुरू केला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here