मुंबई – बायकोला आपल्या मालदीवची सहल कळू नये यासाठी या माणसाने चक्क पासपोर्टची काही पाने फाडून टाकली होती, त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्याला अटक करत त्याला तुरुंगात टाकले आहे.
मुंबईतील एक इंजिनिअर व्यक्ती आपल्या प्रेयसीसोबत मालदीवला मजा-मस्ती करण्यासाठी गेला खरा. मात्र, जाण्याअगोदर त्याने आपल्या पत्नीला ऑफिस कामासाठी बाहेर जात असल्याचे सांगून गेला. तिला या सहलीबद्दलची माहिती मिळू नये यासाठी त्याने पासपोर्टमधील काही पाने फाडून टाकली होती. मालदीववरुन परत आल्यानंतर विमानतळावर उपस्थित अधिकाऱ्यांना जेव्हा त्याचा पासपोर्ट बघितला तेव्हा ही बाब लक्षात आली.
या व्यक्तीने पासपोर्टमधील ३ ते ६ आणि ३१ ते ३४ नंबरची पाने फाडून टाकली होती. आपल्या बायकोला या सहलीबद्दल कळू नये यासाठी त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे. मात्र, त्याच्या बायकोला अगोदरच नवऱ्याचा संशय आला होता. कारण तो गेल्यापासून त्याच्या बायकोच्या फोन किंवा मेसेजला प्रतिसाद देत नव्हता. पासपोर्टमधील पाने फाडणे हा गंभीर गुन्हा असून विमानतळावरील अधिकाऱ्यांनी त्याला अटक करत मुंबई शहर पोलिसांच्या हवाली केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम