Cars Offer | लक्झरी सेडान कारवर मिळतेय लाखोंची बंपर सूट; कसा घ्याल लाभ?

0
23

Cars Offer | तुम्हीही या महिन्यात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. कारण होंडा कार कंपनीकडून त्यांच्या City आणि Amaze या लक्झरी सेडान कारवर आकर्षक ऑफर दिली जाते आहे.

City आणि Amaze सेडान कार खरेदी करून या महिन्यात लाखोंची रुपयांची बचत करण्याची चांगली संधी उपलब्ध आहे. होंडा City आणि amzae सेडान कारवर वेगवेगळ्या ऑफर देण्यात येत आहेत. (Cars Offer)

Marathi Song | ए. टी. पवारांवरील गीत प्रदर्शित! या गौरव गीताला जिल्हाभरातून जोरदार प्रतिसाद

Honda Cars Discount Offer

होंडा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या सिटी सेडान कारवर या महिन्यात आकर्षक ऑफर देण्यात येत आहे आणि सिटी कारच्या पेट्रोल व्हेरियंटवर 1 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या ऑफरमध्ये 27 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट, 27 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट एक्सचेंज बोनस आणि 25 हजार रुपयांपर्यंत रोख सूट दिली जाते आहे.

तसेच ग्राहकांना सिटी कारवर 27 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस देखील दिला जात आहे तसेच सिटी सेडान कारमध्ये 1.5-लिटर चार-सिलेंडर इंजिन देण्यात आलेले आहे जे 121 hp पॉवर आणि 145 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड CVT ट्रान्समिशनशी जोडण्यात आलेले आहेत. कारची एक्स शोरूम किंमत 11.63 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 18.89 लाख रुपयांपर्यंत जाते. (Cars Offer)

Crime News | रिचार्जसाठी पैसे न दिल्याने; नातवाने आजीचा घोटला गळा

Honda Amaze

होंडा कार निर्मात्या कंपनीची Amaze सेडान कार देखील लोकप्रिय कार आहे आणि या कारवर ग्राहकांना 25 हजार रुपयांपर्यंतची कॅश डिस्काउंट, 27 हजार रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस आणि कॉर्पोरेट सूट तसेच 15,000 रुपये एक्सचेंज बोनस दिला जातो आहे.

कारमध्ये 1.2-लीटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन पर्याय देण्यात आलेला आहे. हे इंजिन 90 hp पॉवर आणि 110 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे तसेच कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा CVT ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.10 लाख रुपये इतकी आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here