उंटवाडीतील वृक्षतोडप्रकरणी जाहिरात एजन्सीला सव्वा लाखाचा दंड

0
1

नाशिक – केवळ होर्डींग्जसाठी उंटवाडी येथील म्हसोबा मंदिर प्रांगणातील जागेत असलेली झाडे तोडल्याप्रकरणी महापालिकेने नम्रता अ‍ॅडव्हर्टायजिंगच्या मच्छिंद्र देशमुख यांना सव्वा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

यावेळी उंटवाडी परिसरातील नंदिनी नदीच्या बाजूला म्हसोबा मंदिर प्रांगणाजवळ नव्याने उभारण्यात येत असलेले होर्डिंग्ज दिसण्यासाठी देशमुख यांनी १ कडुनिंब, १ वड, १ पिंपळ असे एकूण तीन झाड बुडापासून तोडले होते. याबद्दल महपालिकेने त्यांना नोटिस बजावली आहे. या नोटिसीत देशमुख यांना १.२५ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

निसर्ग सेवक युवा मंचच्या अमित कुलकर्णी यांनी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर अखेर पश्चिम विभागाच्या वृक्ष अधिकार्‍यांनी ही कारवाई केली आहे.

याआधी मनपाने शुक्रवारी देशमुख यांना ही सदर नोटिस बजावण्यात आली आहे, उत्तर देण्यासाठी त्यांना ३ दिवसांची मुदतही देण्यात आलेली होती. मात्र सोमवारपर्यंत त्यांनी ही नोटिसच स्वीकारली नसल्याने आता मनपा ह्यावर काय भूमिका घेणार, याकडे शहरातील पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.

यावेळी निसर्ग सेवक युवा मंचच्या अमित कुलकर्णी म्हणाले, आम्ही याबाबत तक्रार केल्यानंतर मनपाने जी तत्परता दाखवली त्याचे स्वागतच तर आहे. पण मनपाने वृक्षतोडीबाबत यापुढेही अशीच तत्परता दाखवावी जेणेकरून निसर्गाचा र्‍हास करणार्‍यांवर जरब बसू शकेल. त्याचसोबत नंदिनी नदीपात्रात उभ्या राहत असलेल्या होर्डिंग्जची तात्काळ चौकशी होऊन सदर होर्डिंग्ज उभारणार्‍यांवरही पालिकेने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.

शहरात सध्या केवळ आर्थिक उत्पन्नापोटी कुठेही होर्डिंग्ज उभारणीच्या उद्योगांना काही काळानंतर पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. यांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विभागाने ह्या होर्डिंग्जवर धडक कारवाईची गरज असल्याचे अनेकांकडून करण्यात येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here