Hemant Godse | नाशिकच्या निवडणुकीकडे आता राज्यातील सर्व बड्या नेत्यांचे लक्ष असून, या पार्श्वभमीवर दोन्ही गटांकडून ताकद पणाला लावण्यत आली आहे. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सध्या रोज बड्या नेत्यांच्या भाषणांची, आश्वासनांची, आरोप प्रत्यारोपांची मेजवानी नाशिककरांना अनुभवायला मिळत आहे.
दरम्यान, आज एकीकडे मुंबईत आज महायुती आणि इंडिया आघाडीची सांगता सभा आहे. तर, दुसरीकडे नाशिकमध्ये हेमंत गोडसे आणि भारती पवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तर, राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे आणि भास्कर भगरेंच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. (Hemant Godse)
शिंदे गटाची नामुष्की
गोडसेंच्या (Hemant Godse) प्रचारार्थ महिला मेळावा घेण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या गुरुवार रोजी नाशिकमध्ये आल्या होत्या. त्यांचा महिला मेळावा शहरात आयोजित करण्यात आला होता. मात्र, या महिला मेळाव्याला अपेक्षित गर्दी न जमल्याने मेळावाच रद्द करावा लागला होता. गर्दी न जमल्याने थेट नीलम गोऱ्हे यांची सभा रद्द करण्याची वेळ अखेर शिवसेना शिंदे गटावर नाशिकमध्ये ओढावली.
Hemant Godse | छत्रपती सेनेचा गोडसेंना पाठिंबा; पत्रक काढत कारणही सांगितले..?
Hemant Godse | नेमकं प्रकरण काय..?
गोडसेंच्या प्रचारार्थ गुरुवारी नाशिकमध्ये महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या उपस्थित राहणार होत्या. दोन दिवसांपूर्वीच या मेळाव्याची जय्यत तयारी शिंदे गटाने केली होती. तर, यावेळी तब्बल आठ हजार महिला उपस्थित राहतील, अशा प्रकारचे नियोजनही करण्यात आले होते.
मात्र, प्रत्यक्षात महिला पदाधिकाऱ्यांना किती महिलांची गर्दी जमा करणार..?, असे विचारले असता पदाधिकाऱ्यांच्या यादीनुसार केवळ ५०० ते ६०० इटक्याच महिला जमण्याची संभावना होती. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी जुगाड करूनही सात ते आठ हजार महिलांची उपस्थिती शक्य नसल्याने ऐनवेळी पक्षाला हा महिला मेळावा रद्द करावा लागला.
सभा घ्यायला आल्या अन् पत्रकार परिषद घेऊन गेल्या
हेमंत गोडसेंच्या (Hemant Godse) हॅट्रिकसाठी शिंदे गटाने आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिककडे विशेष लक्ष दिले असून, शिंदे गटाचे अनेक नेते एकापाठोपाठ एक नाशिकमध्ये दाखल होत आहेत. स्थानिक पदाधिकारीही पायाला भिंगरी लाऊन फिरत आहेत. मात्र, या तयारीला गोऱ्हे यांच्या रद्द झालेल्या मेळाव्यामुळे गालबोट लागले. दरम्यान, अखेर सभा घेण्याच्या तयारीने आले असताना रिकाम्या हाती माघारी कसे जायचे..? म्हणून पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडून निलम गोऱ्हे गेल्या.
Hemant Godse | मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि कर्ज ; बघा गोडसेंची संपत्ती किती..?
नाशिकमध्ये राजकीय धुरळा
लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्याचा प्रचार आता सुरू आहे. त्यामुळे एकूणच सर्व उमेदवारांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. बड्या नेत्यांच्या सभा, रॅली, मेळावे घेटले जात आहे. एकूणच नाशिकमध्ये उमेदवारांनी आणि पक्षांनी राजकीय धुरळा उडवला आहे. मात्र, नेत्यांच्या या सभा आणि कार्यक्रमांना गर्दी जमवणे, हीदेखील उमेदवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी डोकेदुखी बनली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे आता शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांची डोकेदुखी वाढली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम