Nashik Loksabha | गेल्या अनेक दिवसांपासून वादात असलेलया नाशिकच्या जागेचा सस्पेन्स अखेर संपला असून, नाशिकचा गड राखण्यात शिंदे गटाला मोठे यश आले आहे. तर, अनेक दिवसांपासून आपली तिकीट वाचवण्यासाठी ठाणे आणि मुंबई वारी करणाऱ्या नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याही प्रयत्नांना यश आले आहे. अखेर सर्वांना मागे सारत हेमंत गोडसेंनी (Hemant Godse) नाशिक लोकसभेतून उमेदवारी मिळवली आहे.
नाशिकच्या जागेवरून महायुतीत वाद सुरू होता. या वादातून आधी मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेतली. त्यांनंतर काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे यांनीही भाजपने नाशिकच्या जागेवरील दावा असोडल्याचे जाहीर केले. दरम्यान, काल मुख्यमंत्र्यांसोबत शिंदे गटाच्या बड्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला असून, गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या या हाय व्हॉल्टेज ड्रामाचा शेवट झाला असून, शिंदे गटाने अधिकृतरीत्या हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केली आहे. (Nashik Loksabha)
Nashik Loksabha | नाशिकच्या जागेवरून भाजपची माघार; आता शिंदेंनी निर्णय घ्यायचाय
एवढ्या विरोधानंतरही गोडसेंच्याच गळ्यात माळ
काल भाजप नेते गिरीश महाजन आणि अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांची भेट झाली. यावेळी महाजनांनी भुजबळांची नाराजी दूर केली असून, यानंतर भाजपने नाशिकच्या जागेवरील दावा सोडला. दरम्यान, अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला असून, आता तिसऱ्यांदा शिंदे गटाने हेमंत गोडसे यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध पत्करून आणि त्यांची समजूत घालून, त्यानंतर भुजबळांना नाराज केल्यानंतर काल त्यांचीही नाराजी दूर करून शिंदे गटाने अखेर हॅटट्रिक करण्यासाठी इच्छुक असलेल्या हेमंत गोडसेंनाच मैदानात उतरवले आहे. त्यामुळे आता नाशिकमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी मुख्य लढत रंगणार आहे.
Nashik Loksabha | भुजबळांच्या सुनबाई निवडणुकीच्या रिंगणात..?
गोडसेंकडे केवळ 18 ते 19 दिवस
भाजप आणि राष्ट्रवादीचा आग्रह मोडीत काढत नाशिकचा गड राखण्यात मुख्यमंत्री आणि शिवसेनेला यश आले आहे. ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांनी प्रचाराचारी एक फेरी पूर्ण केली असून, उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. त्यामुळे आता हेमंत गोडसेंकडे केवळ 18 ते 19 दिवस उरले असून, आता त्यांना पायाला भिंगरी लावून मतदार संघात दुप्पट वेगाने फिरावे लागणार आहे. त्यामुळे साहजिकच आता त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी दमछाक होणार असून, जितके परिश्रम त्यांना तिकीट मिळवण्यासाठी घ्यावे लागले. तितकेच परिश्रम त्यांना आता प्रचाराचे मैदान गाजवण्यासाठीही घ्यावे लागणार आहे.
Nashik Loksabha | नाशिकमध्ये चौरंगी लढत
दरम्यान, यामुळे अता नाशिकमध्ये चौरंगी लढत रंगणार आहे. आता नाशिकमध्ये महायुतीचे हेमंत गोडसे विरुद्ध महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज, आणि वंचिटचे करण गायकर यांच्यात लढत रंगणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम