नाशिक मध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली होती परंतु पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या बदलीनंतर ती मोहीम थंडावली होती. आजपासून पुन्हा या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. आजपासून पुन्हा नाशिककरांसाठी हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे, असे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सांगितले आहे. दुचाकिस्वारांना मागील एका आठवड्याची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपली आहे आणि दुचाकी स्वरांना हेल्मेट वापरणे बंधनकारक झाले आहे.
आजपासून पुन्हा एकदा नाशिक शहरात दुचाकी चालकांना हेल्मेट बंधनकारक आहे. गाडी चालवताना हेल्मेट न घातल्यास मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई होणार आहे. तसेच पाचशे रुपयांचा दंडही आकारला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील हेल्मेट वापराबद्दल पोलीस आयुक्तालयामध्ये अनेक मोहिमा राबवण्याल्या आहेत. या मोहिमांमुळे अपघातांची संख्या कमी झाल्याचे दिसले आहे. नाशिक शहरातील सर्व दुचाकीधारकांनी योग्य प्रतीचे हेल्मेट वापरून आपल्या दुचाकी वाहन चालवावे व वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस विभाग विभागाकडून करण्यात आले आहे.
नाशिक पोलिसांनी शहरात काही पॉईंट ठरवले आहेत जिथे हेल्मेट चेकिंग होणार आहे. आज शहरातील स्वामीनारायण चौक, संतोष टी पॉईंट, एबीबी सर्कल, अशोक स्तंभ, गरवारे पॉईंट, पाथर्डी फाटा, बिटको चौक, बिटको कॉलेजसमोर चेकिंग होणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम