Crime news | हातपाय धुण्यासाठी धरणात गेले अन दोन दिवसांनी सापडला मृतदेह

0
40

Crime news |  शेळगाव येथील धरण क्षेत्रात हातपाय धुण्यासाठी गेलेल्या एका वृद्धाचा तोल गेल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. याप्रकरणी, नशिराबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

दरम्यान, शेळगाव येथे रमेश कोळी (वय ६०) हे पत्नी व मुलासह वास्तव्यास होते. ते शेतमजुरीचे काम करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करित होते.

शनिवारी पहाटे कोळी हे शेळगाव धरणा जवळच्या अन्नपूर्णा माता मंदिर येथे दर्शनासाठी गेलेले होते. त्यावेळी ते धरणात हातपाय धुण्यासाठी गेले असता, त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात पडले.

Malegaon | अद्वय हिरे यांच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ

दोन दिवसांपासून कोळी कुटुंबातील सदस्य तसेच नातेवाइक त्यांचा शोध घेत होते. पण, त्यांच्यासंदर्भात कुठलीही माहिती मिळत नव्हती. सोमवारी सकाळी शेळगाव येथील हेमंत कोळी, भगवान कोळी व सुभाष कोळी हे धरण क्षेत्रात पोहण्यासाठी गेले असता, त्यांना रमेश कोळी यांचा मृतदेह तिथे तरंगताना आढळून आला.

दरम्यान, त्यांनी तातडीने गावातील ग्रामस्थांसह नशिराबाद पोलीस ठाण्यात याबद्दल माहिती कळवली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मृतदेह रवाना केला होता.

Gold-Silver Price | २४ तासांत सोन्याची पुन्हा उसळी, चांदीही सरसावली


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here