‘हवसपायी’ झाला महिलेसमोर नग्न ; महिलेने ब्लॅकमेल करत उकळले पैसे

0
43

The point now – Swati kadam

ऑनलाइन फ्रॉड ऑनलाइन फसवणूक ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आपण बघतो दररोज आपल्या आजूबाजूला कित्येक अशा गोष्टी घडतात ज्यामुळे कळते हिथे ऑनलाईन फसवणूक झाली आहे. फोन हॅक करून कधी बँक अकाउंट खाली केले जाते तर कधी ब्लॅकमेल करून एखादा कडून पैसे उकळले जाते ऑनलाइन फ्रॉड हा आजच्या जगात खूप मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतो

असाच एक धक्कादायक प्रकार रत्नागिरीमध्ये घडला व्हिडिओ कॉल चा नावाखाली हवसेच्या आहारी जाऊन तरुण नग्न झाला आणि त्यानंतर त्या महिलेने त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. या अज्ञात महिलेने व्हिडिओ कॉल करण्याआधी त्याच्याशी गोड गोड बोलून विश्वास निर्माण केला त्यानंतर त्यांनी व्हिडिओ कॉल करायचे ठरवले.

व्हिडिओ कॉल वरती बोलताना विश्वास संपादन केल्यानंतर त्याला पूर्ण नग्न करून व्हिडिओ कॉल चालू असताना तिने तो संपूर्ण व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला त्यानंतर पीडित तरुणांकडून त्या महिलेने ब्लॅकमेल करून पन्नास हजार रुपये उकळले. हे सर्व झाल्यानंतर या तरुणाने रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन आत धाव घेतली त्यानंतर त्याने जे काही झाले त्याची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि या महिलेने अजून किती जणांना फसवले या संपूर्ण प्रकाराचा तपास पोलीस करत आहे. 24 डिसेंबर 2022 रोजी रत्नागिरीत राहणाऱ्या एका तरुणाला एक अनोळखी नंबर वरून एक व्हिडिओ कॉल आला. तरुणांना ज्यावेळी व्हिडिओ कॉल उचलला त्यावेळी व्हिडिओ कॉल एका महिलेने केला होता ती समोरून बोलत होती तरुण देखील तिच्याशी बोलू लागला त्या महिलेने गोड गोड बोलून त्या दोघांमधलं बोलणं वाढवलं आणि विश्वास संपादन केला.

अखेर त्या महिलेने इतकी मैत्री वाढवली की तरुण भावनेच्या बळी पडून तिच्याशी व्हिडिओ कॉल वरती बोलायला तयार झाला व्हिडिओ कॉल वरती बोलत असताना ती महिला पूर्णपणे नग्न झाली तिने या तरुणालाही नग्न होण्यास सांगितले हवसेच्या आहारी जाऊन हा तरुण सुद्धा नग्न झाला. आणि त्याच धर्मात या महिलेने व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला त्यानंतर या कॉल च्या सहाय्याने ती महिला तरुणाला ब्लॅकमेल करत असत.

यानंतर काय त्या महिलेने धमकी देण्यास सुरू केले तुझा नग्न व्हिडिओ माझ्याकडे आहे या बदल्यात मला चांगली रक्कम दे नाहीतर तुझा व्हिडिओ मी युट्युब आणि अनेक काही सोशल मीडियावर अपलोड करेल. अशी धमकी महिला तरुणाला सतत देत तरुण भीतीपोटी त्या महिलेला पन्नास हजार पाचशे रुपये ट्रान्सफर केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर तो इतका त्रासला की थेट पोलीस स्टेशनला गेला आणि पोलिसांना हे सगळे प्रकरण सांगितले पोलिसांनी या अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल केला आहे रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहे.

सावधान व्हा जर तुम्हालाही असे कोणत्याही अननोन किंवा अनोळखी नंबर वरून व्हिडिओ कॉल आले तर कृपया उचलून नाही हात समोरचा स्कॅम असू शकतो तुम्हाला फसवण्याकरिता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here