Breaking news | नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा नाशिकमधील कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली झालेली आहे. पुण्याचे सहआयुक्त संदीप कर्णिक हे आता नाशिक शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
अंकुश शिंदे यांची मागील डिसेंबर २०२२ मध्ये नाशिक शहराच्या पोलीस आयुक्त पदाचा त्यांनी पदभार स्वीकारला होता. दरम्यान, त्यांची अशी तडकाफडकी बदली करण्यात आाल्याने सगळीकडेच आश्चर्य व्यक्त होत आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयातील सहआयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकचे नवे पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. संदीप कर्णिक यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरची पदवी प्राप्त केली आहे.
त्यानंतर ते २००४ च्या बॅचचे आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) अधिकारी आहेत. त्यांनी अहमदनगर, ठाणे, नागपुर, जालना, नांदेड यांसह पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक म्हणूनदेखील काम बघितलेले आहे.
Dhangar Reservation | धनगर मोर्चाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक
तसेच मुंबईत त्यांनी अप्पर आयुक्त म्हणूनही कर्तव्य बजाविलेले आहे. सध्या ते पुणे आयुक्तालयात सहआयुक्त म्हणून कार्यरत होते. तर, आता ते नाशिकचे नवे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
दरम्यान, नाशिकचे मावळते आयुक्त अंकुश शिंदे यांची राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या ११ महिन्यांच्या कार्यकाळात शहरातील गुंडागर्दी रोखण्यासाठी मोक्का अंतर्गत कारवाई करीत त्यांनी गुंडांमध्ये दहशत निर्माण केली होती. तसेच, पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांतही कामचुकारपणाबद्दल तात्काळ कारवाई केल्याने पोलीस दलातही त्यांनी वचक निर्माण केलेला हाेता.
पिंपरी चिंचवडचे आयुक्त असतानाही त्यांची अशीच तडकाफडकी बदली करण्यात आलेली होती. आताही नाशिकचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची पुन्हा गृहविभागाने तडकाफडकी बदली केल्याने सर्वच स्तरांवरून आश्चर्य व्यक्त होत आहे.
Political news | संजय राऊत अब्रुनुकसानी प्रकरणी राणे यांच्याविरोधात कोर्टाकडून वॉरंट
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम