Crime News | लग्नात सासरच्यांचा मानपान केला नाही, तसेच मूलबाळ होत नाही म्हणून विवाहित महिलेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या तीन जणांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी, पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी विवाहित महिलेचे माहेर हे नाशिक शहरातील अंबड परिसरात असून, ती १९ जुलै २०२० ते १७ जानेवारी २०२१ या कालावधीत तिच्या सासरी नांदत होती.
Crime News | निवडणूक हरला म्हणून गावात केला गोळीबार
या काळात तिला पती- प्रसाद सरोते, सासू- मंगला सुभाष सरोते आणि भाग्यश्री जगन्नाथ कासार (सर्व रा. वडगाव शेरी, ता. जि. पुणे) यांनी सर्वांनी एकमत करून विवाहित महिलेला घरचे काम येत नाही, मूलबाळ होत नाही, तसेच लग्नात माहेरच्यांनी मानपान दिला नाही, या कारणांवरून वारंवार शिवीगाळ तसेच मारहाण करून महिलेचा शारीरिक तसेच मानसिक छळ केला.
तसेच तिच्या अंगावरील दागिने जबरदस्ती करत काढून घेतले. दरम्यान, याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात सासरच्या पती, सासू, आणि एक महिला अशा तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा पुढील सविस्तर तपास पोलिस नाईक शिरवले करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम