द पॉईंट नाऊ ब्युरो : भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपी मूळ भारतीय असलेल्या गुप्ता बंधूंना संयुक्त अरब अमिरातमध्ये अटक करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेत सत्तेमध्ये हस्तक्षेप करत भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवल्याप्रकरणी इंटरपोलने जुलै 2021 मध्ये बजावलेल्या रेड कॉर्नर नोटिशीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
गुप्ता कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील सहारनपूरचे. त्यांनी आधी सिंगापूर आणि नंतर दक्षिण आफ्रिकेत अब्जावधी रुपयांचे व्यवसायिक साम्राज्य उभे केले. 90 च्या दशकात गुप्ता बंधू दिल्लीला आले आणि तिथे मसाल्यांचा व्यवसाय केला. यानंतर 1993 मध्ये त्यांनी नव्या संधीच्या शोधात दक्षिण आफ्रिकेकडे प्रयाण केले. इथे आल्यानंतर त्यांचे नशीब उजळले. दक्षिण आफ्रिकेत त्यांचा संगणक व्यवसाय, मायनिंग आणि प्रसार माध्यमांचा बिझनेस फुलला. पाहता पाहता त्यांची दक्षिण आफ्रिकेतील ताकदवान लोकांमध्ये गणना व्हायला लागली. 2016 मध्ये गुप्ता बंधू दक्षिण आफ्रिकेचे 16वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. माध्यमांतील वृत्तानुसार, त्या काळात त्यांची संपत्ती सुमारे 78 कोटी डॉलर (6 लाख कोटी रुपये) इतकी होती.
युरेनियम, सोन्याच्या खाणीत भागीदारी
दक्षिण आफ्रिकेतील गुप्ता बंधूंच्या ज्या कंपन्यांना सोने व युरेनियमच्या खाणी देण्यात आल्या. त्यामध्ये आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती जुमा यांची पत्नी आणि मुलगा संचालक होते. जुमाचा मुलगा दुदुजान जुमा 10 टक्के भागीदार होता. त्यांना सफारी म्हणून विकसित जंगलाचा एका मोठ्या शहराइतका भाग दिला होता. बंधुंच्या कंपन्यांत ओकबे रिसोर्स अँड एनर्जी, टिगेटा, शिवा यूरेनियम आदींचा समावेश आहे.
2015 पासून सुरू झाले वाद
गुप्ता बंधूंच्या व्यवसायावर 2015 मध्ये वादाची सावली पडायला लागली. राजकारणावर त्यांची पकड मजबूत होत चालल्याने ते वादग्रस्त ठरत गेले. जर्मनीच्या एका सॉफ्टवेअर कंपनीला लाच दिल्याचे प्रकरण समोर आले. बंधूंच्या एका कंपनीला जर्मन कंपनीने 70 लाख युरोची लाच दिल्याचा आरोप होता. जून 2017 मध्ये दक्षिण अफ्रिकेच्या माध्यमात 2 लाख ईमेल लीक झाले.
अटकेनंतर प्रत्यार्पणाची तयारी
राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांनी गुप्ता बंधूंना अटक करण्याच्या उद्देशानेच यूएई आणि दक्षिण आफ्रिकेच्या मध्यभागी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रत्यार्पणाची संधी दिली होती. रेड कॉर्नर नोटीस बजावत इंटरपोलने सांगितले होते, गुप्ता बंधूंच्या एका कंपनीला देण्यात आलेल्या 2.5 कोटी रँडच्या (125 कोटी) कंत्राटामध्ये दिलेला धोका आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी आम्ही त्यांच्या शोधात होतो. दोघांच्या अटकेनंतर संयुक्त अरब अमिरात गुप्ता बंधूंना सोपवण्याबाबत मूल्यांकन करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम